World Meditation Day: एकाग्रता वाढविण्यासाठी सोप्या टिप्स

World Meditation Day: एकाग्रता वाढविण्यासाठी सोप्या टिप्स

World Meditation Day: एकाग्रता वाढविण्यासाठी सोप्या टिप्स

संपूर्ण जग सध्या कोरोना नावाच्या डोळ्यांना न दिसणाऱ्या विषाणूशी झगडत आहे. अनेकांचे डोळ्यादेखत जीव जात आहेत. लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचा सर्वात गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे या काळात शरीर आणि मन शांत ठेवणे त्याचबरोबर तणाव कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठीचा एक सोप्पा मार्ग म्हणजे ध्यान करणे किंवा ज्याला आपण मेडिटेशन ( Meditation) असे म्हणतो. आज जागतिक ध्यान दिवस आहे. ध्यान केल्याने आपली एकाग्रता वाढते. मन शांत होते. ध्यान करण्याचे फायदे काय? त्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घ्या. (World Meditation Day: Simple tips to increase concentration)

आपली स्वत:शी संपर्क साधण्याची मानसिक आणि शारीरिक शक्ती वाढविण्यासाठी त्यातबरोबर आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक सोपा मार्ग म्हणजे ध्यान करणे. ध्यान केल्या आपल्या भावना जागृत होतात. स्वत:च्या पलिकडे जाण्यास मदत होते. ध्यान केल्याने आपण स्वत:ला अधिक समजून घेऊ शकतो,असे न्यूट्रिशन अँड फिटनेस सायन्स मधील मानसिकता आणि जीवन मंत्र शिक्षक शशांक लालवाणी यांनी सांगितले आहे. आपल्या मनात भटकत असलेले अनेक अनियंत्रित विचार बाहेर काढून मन एकाग्र करण्यासाठी ध्यान आपल्याला मदत करते. मन एकाग्र करण्यासाठी ध्यान सुरु करावे. मन एकाग्र होत नसल्यास ते एकाग्र करण्यासाठी काही महत्त्वाचे सल्ले.

विचारांचा स्वीकार करा

ध्यान करायला बसल्यावर बऱ्याचदा लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करतो. ध्यान करत असताना अनेक यादृच्छिक विचार मनात येणे सहाजिक आहे. बऱ्याचदा अनेक जण ते विचार बंद करुन शांततेत ध्यान करायला बसतात. असे न करता, मनात येणारे विचरांकडे दुर्लक्ष न करता ते स्वीकारले पाहिजेत आणि ते कबूल देखिल केले पाहिजेत त्यानंतर ध्यानात लक्ष केंद्रीत केले पाहिजे. सुरुवातीला ध्यानात लक्ष केंद्रीत करण्यासाठी ध्यान करण्यासाठी छोटे टार्गेट तयार करा. सुरुवातीला ३-४ मिनिटे ध्यान करा त्यानंतर सरावाने ध्यानाचा कालावधी वाढवा. यामुळे हळू हळू एकाग्रता वाढण्यास मदत होईल.

व्हिज्युअलाइझ करा

मन एकाग्र करण्यासाठी ध्यानला बसताना एक मिनिटांपूर्वी घडलेल्या चांगल्या गोष्टींचे व्हिज्युअलाइझेशन करा. त्यामुळे मनात येणाऱ्या इतर विचार बाजूला होतील. त्यामुळे ध्यानात मन रमेल.

मनात आकार तयार करा

ध्यान केल्याने आत्म जागृतीवर लक्ष केंद्रीत करण्यास मदत होते. ध्यान करत असताना लक्ष विचलीत होत असेल तर  मनात आपल्या आवडीचा एक आकार तयार करा. यामुळे मनातील सर्व विचार,अडथळे दूर होण्यास मोठी मदत होईल.


हेही वाचा – लस घेतल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी आहार कसा ठेवाल? जाणून घ्या

First Published on: May 21, 2021 5:01 PM
Exit mobile version