योगासनांनी वाढवता येणार आता प्रजनन क्षमता, ‘हे’ आठ योगा नक्की ट्राय करा!

योगासनांनी वाढवता येणार आता प्रजनन क्षमता, ‘हे’ आठ योगा नक्की ट्राय करा!

yoga for fertility (Photo - Google)

– डॉ. माधुरी रॉय

Yoga for fertility | तणाव आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांपैकी एक म्हणजेच वंध्यत्व. अनेक जोडपी सतत प्रयत्न आणि वैद्यकीय उपचार करूनही गरोदर राहण्यास असमर्थ ठरतात. या समस्येवर मात करण्यासाठी योगाभ्यास करणे फायदेशीर ठरते.

योगाभ्यासामुळे तणाव आणि नैराश्यावर मात करण्यास मदत होते, या दोन्ही गोष्टी वंध्यत्वाशी संबंधित असतात. तणावामुळे तुमच्या शरीरात मोठ्या प्रमाणात कॉर्टिसोल तयार होतो, जो तुमच्या पुनरुत्पादक अवयवांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतो. काही ठराविक योगप्रकार कोर्टिसोलची पातळी देखील कमी करतात. आणि संपूर्ण शरीरात ऊर्जा निर्माण करू शकतात. गर्भधारणेचा प्रयत्न करणार्‍या महिलांसाठी, या योगाभ्यास फायदेशीर आहे कारण ते शरीर मजबूत करू शकतात आणि गर्भधारणेची शक्यता वाढवू शकतात.

उत्तान शिशुसन

Photo – Google

याला एक्स्टेंडेड पप्पी पोझ (Extended puppy pose) म्हणूनही ओळखले जाते, हे एक आरामदायी योगासन आहे.
तुमच्या गुडघ्यावर बसा. तुमचे पाय एकमेकांना समांतर असल्याची खात्री करा. हात सरळ पुढे पसरवा. यास्थितीत कपाळ जमीनीला स्पर्श करताना हात पुढे असायला हवेत. दीर्घ श्वास घेऊन पूर्वस्थितीत या. हे आसन एक ते दीड मिनिट स्थिर करावं. श्वास घेत पूर्व स्थितीत येऊन आसन सोडावं.

सूर्यनमस्कार

Photo – Google

सूर्यनमस्कारामध्ये शरीरातील रक्ताभिसरण सुधारणाऱ्या आसनांची मालिकाच आहे. सूर्यनमस्काराचा नियमित सराव स्त्रियांना अनियमित मासिक पाळीसाठी उपयोगी आहे. पुढे बाळंतपणात त्यामुळे त्रास कमी होतो. याशिवाय सूर्यनमस्कारामुळे शरीरातील लैंगिक क्रियाही सुधारतात. आपले शरीर लवचिक बनवण्यासाठी आणि ओटीपोटाच्या भागातील समस्या कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार फायदेशीर ठरत आहे.

भ्रामरी प्राणायाम

Photo – Google

भ्रामरी प्राणायाम या आसनामुळे तुमची श्वास घेण्याची क्षमता सुधारते. याशिवाय यामुळे तुम्हाला तणावापासून सुद्धा सहज मुक्ती मिळते. मन शातं असल्यास गर्भधारणेत मदत होते. हे आसन शरीरातील इतर अवयव योग्यरीत्या काम करण्यासाठी मदत करते.

मंडुकासन

Photo – Google

वज्रासनमध्ये बसून आपली मुठी आपल्या नाभीजवळ आणा. मुठी नाभी आणि मांडीजवळ उभ्या ठेवा, हे करताना लक्षात घ्या की बोटं तुमच्या पोटाकडे आहेत. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना पुढे वाकून छाती मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. वाकताना, नाभीवर जास्तीत जास्त दबाव असतो. डोके आणि मान सरळ ठेवा आणि हळू हळू श्वास घ्या आणि श्वास सोडा. या आसनामुळे प्रजनन अवयवांमधील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते.

सुप्त बद्ध कोनासन

Photo – Google

सुप्त बद्ध कोनासन किंवा रीक्लिनिंग बाउंड अँगल पोज शरीराला बळकटी देणाऱ्या रिस्टोरेटिव्ह योगा पोझच्या श्रेणीमध्ये येतात. या योगासनांमुळे योगींच्या शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते, मज्जासंस्था बळकट होते. हे आसन आपल्या हिप्सच्या भागांना उघडण्याचे काम करते. याशिवाय हे मांड्यांच्या आतील स्नायूंवरही काम करते. त्यामुळे पोट फुगणे आणि तणाव या समस्याही दूर होतात.

बालासन

Photo – Google

गुडघ्यांवर बसा आणि डोकं जमिनीवर टेका. तुमच्या टाचा हिप्सना टच करू द्या. पुढच्या बाजूला स्ट्रेच करून तुमचे हात डोक्याच्या पुढे नेण्याचा प्रयत्न करा. श्वासांवर लक्ष केंद्रीत करा. बालासन ताण दूर करण्यास आणि रक्त प्रवाह सुरळीत करण्यात मदत करतं जे प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाचं आहे. हे आसन रिकाम्या पोटी करावे किंवा भोजनाच्या किमान चार ते सहा तासानंतर करावं.

भिंतीवर पाय सरळ ठेवणे

या आसनामुळे फेलोपियन ट्यूबचा भाग मोकळा व्हायला सुरुवात होते. हे आसन करण्यासाठी जमिनीवर झोपा, दोन्ही पाय भिंतीवर ठेवा. गुडघ्यांमध्ये 90 अशांचा कोन असू द्या. जोपर्यंत सहजरित्या या स्थितीत थांबता येईल, तेवढा वेळ थांबा. एका मिनिटाच्या आसनापासून या व्यायामाला सुरुवात करू शकता.

योनी मुद्रा

Photo – Google

 (लेखिका पुण्यातील कन्सिव्ह आयव्हीएफ येथे स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आहेत.)

First Published on: January 30, 2023 4:56 PM
Exit mobile version