८ कोटी नवीन मतदार ठरणार किंगमेकर

८ कोटी नवीन मतदार ठरणार किंगमेकर

नवीन मतदार

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातून एकूण सुमारे ९० कोटी मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात बहुतांश मतदार जुने असतात ज्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाच्या विचारसरणीचा प्रभाव आहे, मात्र यंदा ८ कोटी नवीन मतदार आहेत. त्यांच्यावर मात्र कोणत्याही पक्षाचा प्रभाव नसल्याने इतक्या मोठ्या संख्येने असलेले मतदार हेच खरे किंगमेकर ठरणार आहेत. हे मतदार ज्यांच्या बाजुला झुकतील, त्या पक्षाचा विजय निश्चित आहे.

हा नवमतदार 18 ते 22 या वयोगटातील तरुण आहे. यातील अनेकांना विधानसभेसाठी मतदानाची संधी मिळालीही असेल. पण 2019ला पहिल्यांदाच ते लोकसभेसाठी मतदान करतात. सरासरी लक्षात घेतली तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जवळपास दीड लाख मतदार हे पहिल्यांदाच मतदान करत आहेत. 2014च्या संख्येशी तुलना केली तर 282 लोकसभा मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी मागच्या वेळच्या मताधिक्यापेक्षा नवमतदार हे जास्त आहेत.

महाराष्ट्रातील 48 जागांपैकी तब्बल 12 जागांचा यात समावेश आहे. या नवीन मतदारांचे महत्त्व लक्षात घेऊनच प्रत्येक पक्षाने त्यांना प्रभावित करण्यासाठी मोहिमा आखल्या आहेत. देशातील एकूण मतदारांच्या संख्येत महाराष्ट्राचा उत्तर प्रदेशनंतर दुसरा क्रमांक आहे. उत्तर प्रदेशात एकूण मतदारांच्या 16.2 टक्के तर महाराष्ट्रात 9.6 टक्के मतदार आहेत. देशातील एकूण 90 कोटी मतदारांमध्ये 24 वर्षाखालच्या मतदारांची संख्या 25 टक्के इतकी आहे. त्यामुळे ही तरुणाईच देशाची गादी कुणाच्या हातात द्यायची याचा फैसला करणार आहे.

First Published on: March 5, 2019 4:03 AM
Exit mobile version