आर्वी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ४४

आर्वी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ४४

आर्वी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ४४

आर्वी हे वर्धा जिल्ह्यातील एक शहर आहे. आर्वी हे कापसाचे प्रमुख व्यापारी केंद्र आहे. २०११ च्या जनगननेनुसार आर्वीची लोकसंख्या १,४५,९८१ इतकी आहे. या मतदारसंघात १९९० पासून २००९ पर्यंत काँग्रेसची सत्ता होती. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार दादाराव केचे यांनी काँग्रेसचे अमर काळे यांचा पराभव केला होता. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अमर काळे यांनी दादाराव यांचा पराभव केला. त्यामुळे अमर काळे हे आर्वीचे विद्यमान आमदार आहेत.

मतदारसंघ क्रमांक – ४४
मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,२८,७६१
महिला – १,२०,०६७
एकूण मतदार – २,४८,८२८

विद्यमान आमदार – अमर शरद काळे, काँग्रेस

आर्वी मतदारसंघात काळे कुटुंबियांचे चांगेल वर्चस्व आहे. २०१४ साली देशभरात मोदी लाट होती. मात्र, तरीही भाजपचे उमेदवार आणि तत्कालीन आमदार दादाराव केचे यांचा पराभव होऊन अमर काळे यांचा विजय झाला. अमर काळे यांनी २००४ साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते भरमसाठ मतांनी जिंकून आले होते. त्याअगोदर १९८५ पासून अमर काळे यांचे वडील शरद काळे आर्वीचे आमदार राहिले. शरद काळे यांच्या मोर्चेबांधणीमुळे काँग्रेस आजही आर्वी येथे न डगमगता टिकून राहिली आहे. वडील आमदार असल्यामुळे अमर काळे यांनी देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन लोकोपयोगी कामे, समाजसेवा करण्याचा निर्धार केला. आतापर्यंत त्यांनी बरेच समाजपयोगी कामे केली आहेत.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) अमर काळे, काँग्रेस – ७५,८८६
२) दादाराव केचे, भाजप – ७२,७४३
३) दादाराव उइके, बसपा – ५,३४८
४) संदिप काळे, राष्ट्रवादी – ३,८६१
५) स्वप्नील उर्फ बाळा जगताप, अपक्ष – ३,६४२


हेही वाचा – ८ – वर्धा लोकसभा मतदारसंघ

First Published on: July 31, 2019 5:41 PM
Exit mobile version