बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ७२

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ७२

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा बल्लारपूर मतदारसंघ आहे. मुनगंटीवार यांनी आतापर्यंत चार वेळा या मतदारसंघातून आमदारकी भुषवली आहे. राजकीयदृष्ट्या सजग असलेल्या या मतदारसंघाने राज्याला माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्यासारखा नेता दिला होता. सध्या या मतदारसंघाला मुनगंटीवार यांचा मतदारसंघ म्हणून ओळखले जाते.
बल्लारपूर मतदारसंघात जंगल क्षेत्र असल्यामुळे वन्यप्राणी आणि मानव यांच्यात नेहमी संघर्ष पाहायला मिळतो. उद्योगांची इथे तशी वाणवा आहे. सिंचनाच्या अडचणी आहेत. बल्लारपूर शहरातील पेपर मिलमुळे होणारे प्रदूषण हा देखील चिंतेचा विषय आहे. मागच्या वीस वर्षांपासून काँग्रेस-राष्ट्रवादी या मतदारसंघावर आपली पकड मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना यात अपयश आले.

मतदारसंघ क्रमांक – ७२

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,५८,९७०
महिला – १,४८,४९३

एकूण मतदान – ३,०७,४६३

विद्यमान आमदार – सुधीर मुनगंटीवार, भाजप

महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष, संघाच्या कार्यकर्त्यांशी एकरूप होणारे नेते सुधीर मुनगंटीवार यांचा जन्म ३० जुलै १९६२ रोजी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात झाला. सुधीर मुनगंटीवार यांनी एम.कॉम., एल.एल.बी., एम.फिल., डी.बी.एम., बी.जे. इत्यादी पदव्या संपादन केल्या आहेत. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि सार्वजनिक जीवनाला आरंभ केला. सरदार पटेल महाविद्यालयाच्या छात्रसंघाची निवडणूक जिंकून ते सरचिटणीस पदी निवडून आले. यानंतर १९८१ मध्ये ते चंद्रपूर शहर भाजपचे चिटणीस झाले आणि त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात झाली.

चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे सतत चार वेळा राज्य विधिमंडळात प्रतिनिधित्व करणारे सुधीर मुनगंटीवार १९९५ मध्ये प्रथमच विधानसभेवर निवडून गेले. यावेळी त्यांनी ५५ हजारांचे मताधिक्य मिळविले होते. लगोलग ते भाजपा-सेनेच्या युती सरकार मध्ये पर्यटन आणि ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री देखील झाले. विधीमंडळाचे १९९८ सालचे उत्कृष्ट वक्त्याला दिले जाणारे पारितोषिक सुद्धा त्यांना मिळाले आहे. याखेरीज समाजातील अंध-अपंग व्यक्तींच्या मदतीसाठी वैधानिक लढा देणाऱ्यास दिला जाणारा जी.एल.नार्देकर स्मृती पुरस्कार सुधीरजीना मिळाला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी असलेले गोंडवन विद्यापीठ उभे करण्यात सुधीरजींचा मोठा वाटा आहे. साल २००९ पासून एप्रिल २०१३ पर्यंत ते महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष होते.

बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) सुधीर मुनगंटीवार, भाजप – १,०३,७१८
२) घनश्याम मुलचंदानी, काँग्रेस – ६०,११८
३) राजेश सिंह, बसपा – १०,३४४
४) मनोज आत्राम, गोंडवणा गणतंत्र पक्ष – ६,८३८
५) केशवराव कटरे, शिवसेना – २,५५५

हे वाचा – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ

First Published on: August 2, 2019 5:05 PM
Exit mobile version