वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १७६

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १७६

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ

मध्यमवर्गीय मतदारांचं या मतदारसंघात प्राबल्य आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातला हा विधानसभा मतदारसंघ असून आहे. शिवसेना पक्षाध्यक्षांचे निवासस्थान अर्थात मातोश्री याच मतदारसंघात असल्यामुळे हा शिवसेनेचा गडच मानला जातो. सुरुवातीपासूनच शिवसेनेचं वर्चस्व इथे राहिलेलं आहे. मराठी मध्यमवर्गासोबतच हिंदीभाषिक आणि मुस्लीम मतदारांचं प्रमाण देखील इथे लक्षणीय आहे. त्यामुळेच एमआयएमचे सिराज खान यांनी २०१४ आणि २०१५च्या पोटनिवडणुकीत देखील तिसऱ्या क्रमांकाची मतं इथे मिळवली आहेत. या मतदारसंघात एकूण २५४ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १७६

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या (२०१५)

एकूण मतदार – २,६५,०५०


तृप्ती सावंत

विद्यमान आमदार – तृप्ती सावंत, शिवसेना

२०१४मध्ये प्रकाश उर्फ बाळा सावंत हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. मात्र, २०१५मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचं निधन झालं. या पार्श्वभूमीवर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या नारायण राणेंचा त्यांनी २० हजार मतांनी पराभव केला होता.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) तृप्ती प्रकाश सावंत, शिवसेना – ५२,७११
२) नारायण राणे, काँग्रेस – ३३,७०३
३) सिराज खान, एमआयएम – १५,०५०
४) तुषार जगताप, अपक्ष – २३१
५) शंकर सोनावणे, अपक्ष – ११३

नोटा – ८१९

मतदानाची टक्केवारी – ४७.२२ %


हेही वाचा – मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ
First Published on: August 15, 2019 4:56 PM
Exit mobile version