चांदवड – देवळा विधानसभा मतदारसंघ क्रमांक : ११८

चांदवड – देवळा विधानसभा मतदारसंघ क्रमांक : ११८

नाशिक जिल्ह्यातील चांदवड हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. चांदवड देवळा मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. स्थापनेपासूनच प्रादेशिक अस्मितेच्या जोखडात अडकलेल्या या मतदारसंघामध्ये चांदवड येथील शहरी वसाहत, त्यासोबतच तालुक्यातील गावठाण परिसर यामध्ये येतो. कसमादे म्हणजेच कळवण, सटाना, मालेगाव आणि देवळा या पट्ट्यातील देवळा हा भाग या मतदारसंघात सर्वात महत्वाचा समजला जातो.

चांदवड देवळा या मतदारसंघातील उमराणे हा जिल्हा परिषद गट आजवर प्रत्येक विधानसभेमध्ये निर्णायक भूमिका बजावत आला असल्याने उमेदवारांचे सर्वाधिक लक्ष या मतदारसंघावर आहे.

मतदारसंघ क्रमांक : ११८

मतदारसंघ आरक्षण : खुला

मतदारांची संख्या
पुरुष :  १,४५,८५८
महिला : १,३१,७०६
तृतीयपंथी : ०
एकूण मतदान २,७७,५६४

विद्यमान आमदार : डॉ. राहुल आहेर, भाजप

माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांचे पुत्र म्हणून २०१४ मध्ये भाजपच्या चिन्हावर आमदार झालेल्या डॉ.राहुल आहेर यांना कुटुंबाचा मोठा राजकीय वारसा मिळाला आहे. आहेर या कुटुंबातील जवळपास अर्धा डझन सदस्य सक्रिय राजकरणात आहे. यामध्ये जिल्हा बँकेचे संचालक केदा आहेर, बहीण हिमगौरी आडके नाशिक महापालिकेत माजी स्थायी समिति सभापति सोबतच जवळचे नातेवाईक देवळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आहे.

त्यामुळे संपूर्ण देवळा चांदवड मतदारसंघावर आहेर कुटुंबाने आपला वरचष्मा ठेवला आहे. मात्र यावेळी केदा आहेर विधानसभेसाठी तयारी करत असल्याने राहुल आहेर यांना घरातूनच प्रतिस्पर्धी तयार झाल्याचे चित्र आहे. या दोन भावांमध्येच निवडणूक झाल्यास चांदवड देवळा मतदारसंघातील जनता कोणाला स्वीकारेल हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघ आमदार डॉ. राहुल आहेर

२०१४ विधानसभा निवडणुकीची परिस्थिती

डॉ. राहुल दौलतराव आहेत – भाजप – ५४,९४६
शिरिशकुमार कोतवाल – कॉंग्रेस – ४३,७८५
आत्माराम कुंभार्डे – अपक्ष – २९,४०९


हे ही वाचा – दिंडोरी लोकसभा मतदारसंघ


First Published on: September 16, 2019 5:26 PM
Exit mobile version