दिग्रस विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ७९

दिग्रस विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ७९

दिग्रस विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ७९

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. दिग्रस मतदारसंघ पुर्वी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा मतदारसंघ होता. मात्र त्यांचे वर्चस्व शिवसेनेच्या संजय राठोड यांनी हिरावून घेतले. सध्या संजय राठोड हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. या मतदारसंघात दारव्हा आणि दिग्रस असे दोन तालुके येतात. त्यामुळे याला दारव्हा-दिग्रस विधानसभा मतदारसंघ असेही म्हणतात.

मतदारसंघ क्रमांक – ७९

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,५६,२३९
महिला – १,३९,८२०

एकूण मतदान – २,६९,०५९

विद्यमान आमदार – संजय राठोड, शिवसेना

शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा प्रमुख म्हणून काम करणारे संजय राठोड हे फडणवीस सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री आहेत. तसेच वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. शिवसेनेचे विदर्भातील महत्त्वाचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. संजय राठोड यांनी २००४ मध्ये पहिल्यांदा दारव्हा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांचा त्यांनी पराभव केला होता. तेव्हापासून दारव्हा-दिग्रस मतदारसंघावर त्यांची भक्कम पकड आहे. या मतदारसंघातून सलग तीनवेळा त्यांनी विजय मिळवला आहे.

दिग्रसचे आमदार संजय राठोड

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) संजय राठोड, शिवसेना – १,२१,२१६
२) वसंत गुईखेडकर, राष्ट्रवादी – ४१,३५२
३) देवानंद पवार, काँग्रेस – १८,८०७
४) अजय दुबे, भाजप – १०,९०२
५) विनायक भोयर, बसपा – ३२६२

 


हे वाचा – यवतमाळ लोकसभा मतदारसंघ

First Published on: August 15, 2019 5:55 PM
Exit mobile version