दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १२२

दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघ  – म. क्र. १२२

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पेठ हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. शंभर टक्के आदिवासी असलेल्या पेठ तालुका आणि नागरी वस्ती असलेला दिंडोरी तालुक्याचा समावेश या मतदारसंघामध्ये येतो. हा मतदारसंघ अनुसूचीत जमाती साठी राखीव असून २००९ च्या विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये या मतदारसंघाची स्थापना झाली आहे. महादेव कोळी, कोकणा आदी प्रकारच्या आदिवासी समुदायासोबतच मराठा समाजाची लोकसंख्या प्रामुख्याने आढळते. मराठा समाजाची मते या मतदारसंघात निर्णायक समजली जातात.

मतदारसंघ क्रमांक : १२२

मतदारसंघ आरक्षण : अनुसूचीत जमाती

मतदारांची संख्या
पुरुष : १,५४,६२५
महिला : १,४४,७१८
तृतीयपंथी :२
एकूण मतदान : २,५९,२२५

विद्यमान आमदार : नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी

विधानसभेच्या २००४च्या निवडणुकीमध्ये नरहरी झिरवाळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी करत विजय मिळवला होता. राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते असलेला हा मतदारसंघ २००९ च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या ताब्यात गेला. त्यावेळी सेनेच्या धनराज महाले यांनी आपला वरचष्मा या मतदारसंघवर ठेवला. मात्र, २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची जरी हवा होती तरी देखील तळागाळातील कार्यकर्त्यांची मोट बांधत नरहरी झिरवाळ यांनी विजयश्री खेचुन आणली आहे.

धनराज महाले यांनी नुकतेच राष्ट्रवाडीकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, पराभवानंतर पुन्हा शिवबंधन बांधत त्यांनी विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या वेळीही महाले आणि झिरवाळ यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे.

दिंडोरी विधानसभा मतदारसंघ आमदार नरहरी झिरवाळ

२०१४ विधानसभा निवडणुकीची परिस्थिती

नरहरी झिरवाळ राष्ट्रवादी कॉंग्रेस -६८ २८४
धनराज महाले – शिवसेना – ५५,६५१
रामदास चारोस्कर- कॉंग्रेस – ४३,४१५


हे ही वाचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ


First Published on: September 15, 2019 2:32 PM
Exit mobile version