हातकणंगले विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७८

हातकणंगले विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७८

हातकणंगले विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २७८

हातकणंगले विधानसभा मतदार संघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पण मागील काही वर्षांतील निवडणूकांमुळे काँग्रेसचा हा बालेकिल्ला ढासळला आहे. मागील दोन ते तीन विधानसभा निवडणूकांचा आढावा घेतल्यास हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस, शिवसेना, जनसुराज्य आणि स्वाभिमानी अशी बहुरंगी लढत या विधानसभा मतदारसंघात झाली आहे. २००९ मध्ये विद्यमान आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी निवडून येत या मतदारसंघावर सर्वप्रथम भगवा फडकवला. त्यानंतर २०१४ मध्येही डॉ. सुजित मिणचेकर पुन्हा आमदार झाले.

मतदारसंघ क्रमांक – २७८

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती

मतदारांची संख्या

पुरूष – १,५७,६०२
महिला – १,४४,९३८
एकूण – ३,०२,५४०

विद्यमान आमदार – डॉ. सुजित वसंतराव मिणचेकर

विद्यमान आमदार – डॉ. सुजित वसंतराव मिणचेकर

डॉ. सुजित वसंतराव मिणचेकर हे हातकणंगले या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. २९ ऑक्टोबर १९७० रोजी कोल्हापूरमध्ये डॉ. सुजित मिणचेकर यांचा जन्म झाला. ते उच्चशिक्षित आहेत. त्यांना वाचनाबरोबरच संगीत, विविध वाद्ये वाजवणे त्यासोबतच नाटकांमध्ये अभिनय करण्याची आवड आहे. मागील निवडणूकीत काँग्रेसच्या जयवंत आवळे यांचा शिवसेनेच्या डॉ. सुजित मिणचेकर यांनी पराभव केला होता. २००९ मधील विधानसभा निवडणूकीत डॉ. सुजित मिणचेकर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत हातकणंगले विधानसभा मतदार संघावर सर्वप्रथम भगवा फडकला होता. त्यानंतर २०१४च्या निवडणूकीतही त्यांनी विजयी घोडदौड कायम ठेवली.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) डॉ. सुजित वसंतराव मिणचेतर, शिवसेना – ८९,०८७
२) जयवंतराव आवळे, काँग्रेस – ५९,७१७
३) राजू आवळे, जनसुराज्य – ३२,८७४
४) प्रमोद कदम, स्वा. शेतकरी संघटना – २१,३१८
५) प्रेमकुमार माने, बहुजन मुक्ती पक्ष – ५,१९८


हेही वाचा – शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७७

 

First Published on: August 13, 2019 10:03 PM
Exit mobile version