इंदापूर विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २००

इंदापूर विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २००

काँग्रेसचे ज्येष्ठनेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि विद्यामान आमदार दत्तात्रय भरणे हे दोघेही संध्या संभ्रमात आहेत. त्याचे कारण म्हणजे ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित विधानसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी निश्चित आहे. त्यामुळे इंदापूरची जागा नक्की कुणाला मिळणार..या काळजीने दोघेही चिंताग्रस्त आहेत.

इंदापूर मतदार संघातून हर्षवर्धन पाटील सलग चार वेळ निवडून आले आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी काँग्रेसला हा मतदारसंघ हवा आहे. त्यामुळे या मतदार संघाकडे सर्वच मतदार संघाकडे सर्वच मतदारांचे लक्ष सध्या लागलं आहे. २०० क्रमांकाचा इंदापूर मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील बारामती या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३४० मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – २००

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,४६,५१६

महिला – १,३०,३९५

एकूण मतदार – २,७६,९११


विद्यमान आमदार – दत्तात्रय विठोबा भरणे

दत्तात्रय विठोबा भरणे यांचे शिक्षण बी. कॉम झाले असून श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानी नगर येथील १९९२ पासून संचालक म्हणून कार्यरत होते. तसेच, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १९९६ पासून २००२ ते २००३ पर्यंत ते चेअरमन म्हणून कार्यरत होते. यासह १९९१ ते १९९९ या काळात काँग्रेस पक्षाचे कार्य त्यांनी सांभाळले.
ऑक्टोबर २०१४ मध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभेवर निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांचा दणदणीत विजय झाला आहे.

दत्तात्रय विठोबा भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असून त्यांनी २०१४ साली १,०८,४०० मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे हर्षवर्धन पाटील उभे होते. त्यांना ९४,२२७ मतं मिळाले होते.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या


नोटा – ४३५
मतदानाची टक्केवारी – ७८.७७%


हेही वाचा – इंदापूर विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २००

First Published on: August 6, 2019 8:49 AM
Exit mobile version