जळगाव (जामोद) विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७

जळगाव (जामोद) विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७

जळगाव (जामोद) विधानसभा मतदारसंघ

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद) हा क्रमांक २७ वा विधानसभा मतदारसंघ आहे. जळगाव जामोद हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. जळगाव जामोद शहर हे सातपुड्याच्या कुशीत असल्याने त्याला सातपुडा नगरी म्हणून संबोधले जाते. सातपुड्यात भिंगारा हे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे. एकेकाळी शिवाजी महाराजांचे वास्तव्य असलेला मैलगडसुद्धा आहे, जामोद हे एक ऐतिहासिक वारसा असलेले गाव आहे. जळगाव जामोदपासून सहा किमी अंतरावर श्री महासिद्ध महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धानोरा नगरींमध्ये ८४ सिद्धांपैकी एक असे श्री महासिद्ध महाराजांचे प्राचीन मंदिर व समाधी आहे. तेथे दरवर्षी माघ शुद्ध पौणिमेला यात्रा असते. ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी व आठ दिवस चालणारी असते.

मतदारसंघ क्रमांक – २७

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,०४,०१२
महिला – ८६,४२८

एकूण मतदार – १,९०,४४०

विद्यमान आमदार – डॉ. संजय कुटे, भाजप

जळगाव (जामोद) विधानसभा मतदार संघात भाजपचे कामगार कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी गेली १५ वर्ष तीन टर्म आमदार राहिलेले कृष्णराव इंगळे यांचा पराभव करत बहुतांश काँग्रेसच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ गेल्या पंधरा वर्षांपासून आपल्या ताब्यात घेतला आहे. १९८९ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवलेले कृष्णराव इंगळे पहिल्यांदा या मतदारसंघंमधून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रेवश करत १९९४ आणि १९९९ मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवत ते विजयी झाले. त्यानंतर २००४ च्या निवडणुकीमध्ये डॉ. संजय कुटे यांनी कृष्णराव इंगळे यांचा पराभव केला.

आमदार डॉ. संजय कुटे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) डॉ. संजय कुटे, भाजप – ६३,८८८

२) बाळासाहेब तायडे, बीबीएम – ५९,१९३

३) रामविजय बुरंगळे, काँग्रेस – ३६,४६१

४) संतोष घाटोळ, शिवसेना – ९,४६७

५) रमेश घोलप, अपक्ष – ६,५४०



हे वाचा – बुलढाणा लोकसभा मतदारसंघ

First Published on: July 29, 2019 10:42 PM
Exit mobile version