जुन्नर विधानसभा मतदारसंघ- म. क्र. १९५

जुन्नर विधानसभा मतदारसंघ- म. क्र. १९५

१९५ क्रमांकाचा जुन्नर मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील शिरूर या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३२५ मतदान केंद्र आहेत. शिरूर या विधानसभा मतदार संघात जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर या सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे.

मतदारसंघ क्रमांक – १९५

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,५६,५४०

महिला – १,४०,२८९

एकूण मतदार – २,९६,८३४


विद्यमान आमदार – शरददादा भिमाजी सोनावणे

शरददादा भिमाजी सोनावणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार असून त्यांनी २०१४ साली ६०,३०५ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या श्रीमती आशा बुचके हे आमने-सामने उभे होते. यावेळी त्यांना ४३, ३८२ मतं मिळाली होती.

राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत जुन्नर विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या शरददादा भिमाजी सोनावणे यांनी ६०,३०५ एवढी मते घेत विजय मिळवला. जुन्नर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनाच्या श्रीमती आशा बुचके या होत्या त्यांना ४३, ३८२ मते मिळाली आणि त्यांचा १६,९२३ मतांनी पराभव झाला. जुन्नर विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके, चौथ्या स्थानावर भाजपचे नेताजी डोके आणि पाचव्या क्रमांकावर अपक्षचे मारूती वायाळ होते.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या


नोटा – १,७५५

मतदानाची टक्केवारी – ७१.४१%


हेही वाचा – शिरुर लोकसभा मतदारसंघ

First Published on: August 7, 2019 11:51 AM
Exit mobile version