पाटण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २६१

पाटण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २६१

पाटण हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याचे गाव आहे. पाटण हा सातारा जिल्ह्यातील तालुका आहे, माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण हे देखील याच गावाचे आहेत. पाटण तालुक्यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध कोयना धरण आहे. तालुक्याला सह्याद्रीच्या पर्वत रांगाचा सुंदर चेहरा लाभला आहे. हे सर्व महत्वाचे आहे विजनिर्मती मोठ्या प्रमाणात तयार होते. निसर्गरम्य असे वातावरण या तालुक्यात आहे. गारवडे, बहुले, मारुल, पापर्डे दिवशी अशी काही गावे खूप छान आहेत. मारुल हे गाव खासदार श्रीनिवास पाटील यांचे आहे. या पाच-सहा गावांसाठी कर्मवीर भावराव पाटील यांनी एका टेकडीवर १९४७ मद्ध्ये शाळा सुरु केली होती. या शाळेचे नाव (रयत शिक्षण संस्थेचे) ठक्कर बाप्पा विद्यालय गांधी टेकडी असे आहे. शाळा निसर्गाच्या वातावरणात आहे. शाळेच्या शेजारी विहिरीकेषण हा पाण्याचा मोठा प्रकल्प आहे.ना.बाळासाहेब.देसाई.विद्यालय.कुसरुंड विद्यालय हे रयतेचे आहे.हे विद्यालय कुसरुंड या गावी आहे. या संस्थेने कॉलेज उभारली आहेत. तालुक्यात ओझर्डे गावात धबधबा आहे. तालुक्यात शंभूराजे(शिवसेना) व विक्रमसिह पाटणकर(राष्ट्रवादी) यांचे दोन गट आहेत. मरळी गावात देसाई सह. साखर कारखाना आहे.


मतदारसंघ क्रमांक – २६१

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या
पुरुष – १४,२५,००
महिला – १३,८६,८८

एकूण मतदार – २८,११,८८


 

विद्यमान आमदार – शंभुराज देसाई, शिवसेना

सातार जिल्हातील पाटण तालुक्यातील शंभुराज देसाई शिवसेनेचे नेते आहेत. १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. २००४ आणि २०१४ असे दोन वेळा त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली


 

पहिले पाच उमेदवार

१. शंभूराज देसाई, शिवसेना – १,०४,४१९
२. सत्यजितसिंह पाटणकर,राष्ट्रवादी – ८५,५९५
३. हिंदूराव पाटील,काँग्रेस- ७,६४२
४. दिपक महाडिक,बीजेपी- २,१०२
५.सागर माने, अपक्ष- २०८४

First Published on: August 12, 2019 10:31 AM
Exit mobile version