कारंजा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ३५

कारंजा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ३५

कारंजा विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ३५

वाशिम जिल्ह्यातील कारंजा हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. कारंजामध्ये मराठा समाज ४० टक्के, मुस्लिम आणि दलित प्रत्येकी दहा टक्के आहे. तर बंजारा समाजाचेही इथे बऱ्यापैकी संख्या आहे.
कारंजा नगर पालिका आणि तालुक्यातील मानोरा नगरपंचायत ही भारिपच्या ताब्यात आहे. कारंजामध्ये भारिपची चांगली ताकद आहे. कारंजात विकास खुंटलेला आहे. आदिवासी समाजाची इथे मोठ्या प्रमाणात संख्या आहे. सिंचन आणि पुरातन वेशींची डागडुजी असे दोन महत्त्वाचे प्रश्न मतदारसंघात प्रलंबित आहेत. यावेळी भाजपकडून विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी, सेनेचे प्रकाश डहाके निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत.

मतदारसंघ क्रमांक – ३५

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,५०,५०६
महिला – १,३८,२००

एकूण मतदान – २,८८,७०६

विद्यमान आमदार – राजेंद्र पाटणी, भाजप

सध्या या मतदारसंघावर भाजपचा आमदार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यासमोर हा मतदारसंघ राखण्याचे मोठे आव्हा आहे. कारण शिवसेना हा मतदारसंघ आपल्या वाट्याला यावा, यासाठी प्रयत्न करत आहे. पाटणी हे १९९८, २००४, २००९ आणि २०१४ असे चार वेळा आमदर म्हणून निवडून आलेले आहेत. विधानसभेतही त्यांनी लोकलेखा समिती, उपविधान समिती, आश्वासन समिती आणि इतर विविध समित्यांवर काम केलेले आहे.
उच्चशिक्षित असलेले पाटणी हे मतदारसंघावर चांगली पकड ठेवून आहेत. २०१४ साली सेना-भाजप वेगळी लढूनही त्यांनी मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला होता.

कारंजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) राजेंद्र पाटणी, भाजप – ४४,७५१
२) मो. युसुफ पुंजाणी, भारिप – ४०,६०४
३) रणजित जाधव, मनसे – २९, ७५१
४) प्रकाश डहाके, अपक्ष – २७,०४३
५) सुभाष ठाकरे, राष्ट्रवादी – २१,०६८


हे वाचा – यवतमाळ लोकसभा मतदारसंघ

First Published on: August 14, 2019 6:04 PM
Exit mobile version