किनवट विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८३

किनवट विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८३

किनवट विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ८३

नांदेड जिल्ह्यातील किनवट हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. मूलभुत सुविधांपासून वंचित असलेला हा एक मतदारसंघ होता. किनवट मतदारसंघात प्रसिद्ध माहुरगडावर रेणूका मातेचे मंदिर आहे. साडे तीन शक्तीपिठांपैकी एक असलेले असे हे शक्तीपिठ आहे. माहुर गडाच्या निमित्ताने माहुर तालुक्यात चांगले रस्ते पाहायला मिळतात. किनवट आणि माहुर तालुका जरी नांदेड जिल्ह्यात येत असला तरी तो यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये बंजारा समाज अधिक संख्येने दिसतो. बंजारा समाजाची संस्कृती आपल्याला या तालुक्यांमध्ये पाहायला मिळते.

मतदारसंघ क्रमांक – ८३

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,४६,१७९
महिला – १,३१,००७
एकूण मतदान – २,७७,१८७

विद्यमान आमदार – प्रदिप जाधव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस

किनवट तालुक्यातील दहेली तांड्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झाला. खालच्या पातळीपासून समाजकार्याला सुरुवात केली. प्रदिप जाधव हे २००३ पासून वसंतराव नाईक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी भटक्या व विमुक्त जाती-जमातीच्या लोकांना व्यवसायासाठी थेट कर्ज योजना आणि विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज योजना लागू केली. २००४ पासून ते सलग तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करत आहेत.

आमदार प्रदीप नाईक जाधव

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) प्रदिप जाधव नाईक, राष्ट्रवादी – ६०,१२७
२) रामजी केराम, अपक्ष – ५५,१५२
३) अशोक सुर्यवंशी, भाजप – १८,६९५
४) डॉ. बी. डी. चव्हाण, शिवसेना – १८,२२७
५) अर्जुन आडे, सीपीएम – ४१५८


हे वाचा – हिंगोली लोकसभा मतदारसंघ

First Published on: August 18, 2019 7:48 PM
Exit mobile version