मलबार हिल विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १८५

मलबार हिल विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १८५

मलबार हिल विधानसभा मतदारसंघ

मुंबई शहरातल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातला हा एक विधानसभा मतदारसंघ आहे. उच्चभ्रू वस्ती आणि उच्चभ्रू मतदार असलेल्या या मतदारसंघात सुशिक्षित मतदारांचं प्रमाण मोठं आहे. १९९५पूर्वीपर्यंत या मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व होतं. मात्र, १९९५च्या निवडणुकीत भाजपचे मंगलप्रभात लोढा इथून निवडून आले. तेव्हापासून इथे दुसऱ्या कोणत्याही पक्षाला मतदारांनी साथ दिलेली नाही. या मतदारसंघात एकूण २७५ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १८५

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,४७,००८
महिला – १,३०,५७८

एकूण मतदार – २,७७,५८६


मंगलप्रभात लोढा

विद्यमान आमदार – मंगलप्रभात लोढा, भाजप

१९९५पासून २०१४पर्यंत झालेल्या ६ विधानसभा निवडणुकांमध्ये सलग ६ वेळा मंगलप्रभात लोढा आमदार म्हणून निवडून आले आहे. गर्भश्रीमंत आणि मोठे बांधकाम व्यावसायिक म्हणून लोढांची ओळख आहे. मधल्या काळात त्यांच्या वरळीतील मुख्यालयामध्ये सापडलेल्या नोटांच्या दृश्यांमुळे त्यांच्यावर आर्थिक हेराफेरी आणि हवालाचे आरोप करण्यात आले होते. मात्र, त्या वादावर कालांतराने पडदा पडला आणि लोढा पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. सध्या मंगलप्रभात लोढा भाजपचे मुंबई अध्यक्ष आहेत.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) मंगलप्रभात लोढा, भाजप – ९७,८१८
२) अरविंद दुधवाडकर, शिवसेना – २९,१३२
३) सुशीबेन शाह, काँग्रेस – १०,९२८
४) राजेंद्र शिरोडकर, मनसे – ३९२५
५) नोटा – १२७९

मतदानाची टक्केवारी – ५२.५६ %


हेही वाचा – दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ
First Published on: August 17, 2019 8:42 PM
Exit mobile version