साकोली विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ६२

साकोली विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ६२

साकोली विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ६२

साकोली विधानसभा मतदारसंघ भंडारा जिल्ह्यात आहे. हा विधानसभा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. २०११ च्या जनगननेनुसार या मतदारसंघाची लोकसंख्या १ लाख ३६ हजार ८७९ इतकी होती.

मतदारसंघ क्रमांक – ६२

मतदारसंघ आरक्षम – खुला

मतदारांची संख्या

पुरुष – १,११,२९४
महिला – १,०६,६१२
एकूण मतदार – २,१७,९०६

विद्यमान आमदार – राजेश लहानुजी काशिवार, भाजप

विद्यमान आमदार राजेश काशिवार

राजेश काशिवार हे साकोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. राजेश १९९७ ते २००३ पर्यंत भाजपच्या प्रदेश युवा मोर्चाचे सदस्य होते. २००६ ते २००९ काशिवार भंडारा जिल्ह्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. २००९ ते २०१४ काशिवार भंडारा जिल्ह्याचे महामंत्री होते. २०१० ते २०१४ ते भंडारा जिल्हापरिषदेचे सदस्य आणि गटनेता होते. २०१४ साली त्यांनी पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा प्रचंड मतांनी विजय झाला होता.

गेल्या पाच वर्षात आमदार राजेश काशिवार अपात्र ठरवण्यावरुन चांगल्या चर्चेत आले होते. साकोलीचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. २०१४च्या विधानसभा निवडणुकीला नामनिर्देशक पत्र दाखल करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत दोन सरकारी कंत्राट अस्तित्वात असल्याचे कोर्टात सिद्ध झाले होते. त्यामुळे मुंबई हाय कोर्टच्या नागपूर खंडपीठाने त्यांना अपात्र ठरवले होते. या सुनावणीवर काशिवार सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने मुंबई हाय कोर्टच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे राजेश काशिवार यांना मोठा दिलासा मिळाला.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१. राजेश काशिवार, भाजप – २,९६,१८८
२. सेवक वाघाये, काँग्रेस – ५५,४१३
३. डॉ. महेंद्र गणवीर, बसप – ३१,६४९
४. सुनिल फुंडे, राष्ट्रवादी – १९,८८८
५. अजय तुमसर, अपक्ष – ११,८६४

First Published on: September 16, 2019 2:47 PM
Exit mobile version