शिरोळ विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २८०

शिरोळ विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २८०

शिरोळ विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यात आहे. हा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. २००४च्या निवडणूकीपर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला शिरोळ विधानसभा मतदारसंघावर स्वा. शेतकरी संघटना आणि शिवसेना यांच्या वर्चस्वाखाली आला.

मतदारसंघ क्रमांक – २८०

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

पुरुष – १,४८,४८५
महिला – १,३९,४६४
एकूण – २,८७,९४९

विद्यमान आमदार – उल्हास संभाजी पाटील

विद्यमान आमदार – उल्हास संभाजी पाटील

शिरोळ मतदारसंघाचे उल्हास संभाजी पाटील हे विद्यमान आमदार आहेत. कोल्हापूरमधील शिरोळमध्ये १० ऑगस्ट १९६२ रोजी उल्हास पाटील यांचा जन्म झाला. ते उच्चशिक्षित आहेत. त्यांना वाचनासह खो-खो, कबड्डी या खेळांची आवड आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र पाटील यांचा पराभव केला होता.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) उल्हास संभाजी पाटील, शिवसेना – ७०,८०९
२) राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस – ५०,७७६
३) सावकार मादनाईक, स्वा. शेतकरी संघटना – ४८,५११
४) सा. रे. पाटील, काँग्रेस – ४८,०६६
५) सुरेश कडाळे, अपक्ष – २,५८०


हेही वाचा – इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७९

First Published on: August 14, 2019 8:23 PM
Exit mobile version