सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २४

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २४

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हा क्रमांक २४ वा विधानसभा मतदारसंघ आहे. स्वराज्यजननी राजमाता जिजाऊंची जन्मभूमी अशी ओळख असलेल्या सिंदखेड राजामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. राज्यात आघाडीत आणि युतीमध्ये जो सुप्त संघर्ष सुरु आहे त्याची झलक सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळते. शिवसेनेचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर गेल्या पाच वर्षांपासून या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. यंदाही ही जागा शिवसेनेच्या वाट्याला जाणार हे जवळपास निश्चित आहे. परंतू भाजपाचाही या जागेवर डोळा असल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. त्यामुळे भाजपच्या हालचालीवर सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा गड असलेल्या या मतदारसंघावर आता काँग्रेसही दावा सांगत असल्याने आघाडीतही सर्व काही आलबेल आहे, असे म्हणता येणार नाही.

मतदारसंघ क्रमांक – २४

मतदारसंघ आरक्षण- खुला

मतदारांची संख्या
पुरुष – ९८,४९७
महिला – ८४,६०४

एकूण मतदार – १,८३,१०१

विद्यमान आमदार – डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना

बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून आमदार. डॉ. शशिकांत खेडेकर ओळखले जातात. वडील नरसिंगराव खेडेकर यांचा सामाजिक व राजकीय वारसा पुढे नेण्याचे काम डॉ. यशस्वीपणे करत आहेत. काँग्रेसच्या चळवळीतून राजकीय जीवनाला त्यांनी सुरुवात केली. ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडवत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. जिल्हा परिषद सदस्य, अर्थ व बांधकाम सभापती या पदावरही त्यांनी काम करताना आपली छाप पाडली. दरम्यान, त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला. या काळात त्यांच्यावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. विधानसभेच्या २००४, २००९ मधील निवडणुकीत त्यांना या मतदार संघात पराभवाचा सामना करावा लागला. मात्र निवडणुकीतील अपयशाने खचून न जाता त्यांनी समाजकारण व राजकारणातील सहभाग सक्रिय ठेवला.

आमदार डॉ. शशिकांत खेडेकर

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना – ६४,२०३

२) डॉ. गणेश मंते, भाजप – ४५,३४९

३) रेखा खेडेकर, राष्ट्रवादी – ३७,१६१

४) विरोद वाघ, मनसे – १३,५३३

५) प्रदीप नागरे, काँग्रेस – ७,२६१



हे वाचा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघ

First Published on: July 29, 2019 9:59 PM
Exit mobile version