सिन्नर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १२०

सिन्नर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १२०

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. या मतदारसंघात सिन्नर तालुक्यातील गावठाण परिसर, बाजूलाच असलेला औद्योगिक भाग तसेच तालुक्यातील छोटी मोठी गावे यांचा समावेश होतो. सध्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिति आणि विद्यमान आमदार यांच्या जनसंपर्कामुळे हा भाग शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मतदारसंघात प्रामुख्याने मराठा आणि वंजारी या समुदायाची लोकं आढळतात. निवडणुकीमध्ये मात्र वंजारी समाजाची मते निर्णायक ठरली आहे. व्यक्तिकेंद्रित असलेला हा मतदारसंघ एका उमेदवारला संधी दिल्यास त्याच उमेदवाराला पुन्हा संधी देत असल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे.
मुख्यमंत्र्यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्ग याच तालुक्यामधून जातो. येथील शेतकर्‍यांनी सर्वाधिक आंदोलने करून सर्व राज्याचे लक्ष वेधून घेतले होते.

मतदारसंघ क्रमांक – १२०

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष : १,५८,४९३
महिला : १,४१,५७९
तृतीयपंथी : ५
एकूण मतदान ३,००,०७७

विद्यमान आमदार : पराग ( राजाभाऊ) वाजे , शिवसेना

विधानसभेचे माजी सदस्य शंकर वाजे यांचा राजकीय वारसा मिळालेल्या पराग वाजे २०१४ मध्ये विधानसभेमध्ये गेले. पराग वाजे यांनी राजकीय विचारांपेक्षा समाजकारण करणे हाच मुख्य हेतु ठेवला. पराग वाजे यांचे वडील प्रकाश वाजे हे देखील राजकारणापासून दूर राहिले. मात्र, सध्याचे राजकीय विरोधक असलेले माणिकराव कोकाटे हे प्रकाश वाजे यांचा शब्द प्रमाण मानायचे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जनतेच्या आग्रहाखातर पराग वाजे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध उभे राहिले. जातीय समीकरणे जुळवत त्यांनी माणिकरवन्न पराभवाची धूळ चारत विधानभवनात प्रवेश करून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली.

सिन्नर विधानसभा मतदारसंघ आमदार पराग वाजे

२०१४ विधानसभा मतदान परिस्थिती

पराग ( राजाभाऊ वाजे ) – शिवसेना – १,०४,०३१
माणिकराव कोकाटे – भाजप – ८३,४७७
संपत काळे – कॉंग्रेस – ३,३१७
शुभांगी गर्जे – राष्ट्रवादी कॉंग्रेस – २,०५२


हे देखील वाचा – नाशिक लोकसभा मतदारसंघ

First Published on: September 14, 2019 5:01 PM
Exit mobile version