तासगाव-कवठे-महांकाळ विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २८७

तासगाव-कवठे-महांकाळ विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २८७

२८७ क्रमांकाचा तासगाव-कवठे-महांकाळ मतदारसंघ हा सांगली जिल्ह्यातील सांगली या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण २८५ मतदान केंद्र आहेत. तासगाव आणि कवठेमहांकाळ हे दोन्ही तालुके राजकीय दृष्ट्या अधिक जागरूक आणि संवेदनशील म्हणून ओळखला जातो. तासगावचे नेते स्वर्गीय दिनकर आबा पाटील हे तीन वेळा तासगावचे आमदार म्हणून निवडून आले होते. स्वर्गीय दिनकर आबांनी तासगाव साखर कारखान्याच्या उभारणीसाठी माजी  मुख्यमंत्री  स्वर्गीय वसंतदादांची मदत न घेता राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सहकार्य घेतले.  यामुळे दादांच्या  जिल्ह्यातील एकमुखी नेतृत्वाला आव्हान तासगावातून मिळाले. यातूनच तासगावच्या राजकीय पटलावर सांगलीच्या आशीर्वादाने आर आर आबांचा राजकीय उदय झाला.

मतदारसंघ क्रमांक – २८७

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,४३,००५

महिला – १,२८,२६३

एकूण मतदार – २,७१,२७३


विद्यमान आमदार – श्रीमती सुमन रावसाहेब आर.आर. पाटील

श्रीमती सुमन रावसाहेब आर.आर. पाटील , राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे असून २०१४ साली ते १ लाख ३१ हजार २३६ मतांनी विजयी झाले होते. तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील दुष्काळ संपुष्टात आणण्याचे आर. आर. पाटील यांचे स्वप्न त्यांच्या अकाली जाण्याने अधुरे राहिल्याने त्यांच्या कामाचा वारसा जपण्याचा त्यांनी यावेळी प्रयत्न केला. या निवडणुकीमध्ये अपक्ष असणारे अॅड. स्वप्नील दिलीपराव पाटील हे विरूद्ध उभे होते. या निवडणुकीत अॅड. स्वप्नील दिलीपराव पाटील यांना १८ हजार २७३ मतं पडून ते विजयी झाले होते.

पहिल्या काही उमेदवारांची मतसंख्या


नोटा – ११५२

मतदानाची टक्केवारी – ७५.८४%


हेही वाचा – सांगली लोकसभा मतदारसंघ
First Published on: August 20, 2019 11:05 AM
Exit mobile version