वर्धा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ४७

वर्धा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ४७

वर्धा विधानसभा मतदारसंघ

वर्धा शहर हे वर्धा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जिल्ह्याचे सर्व महत्त्वाचे मुख्य शासकीय कार्यालये वर्धा शहरात आहेत. वर्धा नदीच्या नावावरुन वर्धा हे नाव शहराला पडले. २०११ च्या जनगननेनुसार वर्धा शहराची ३ लाख ५७ बजार ४७६ इतकी लोकसंख्या आहे. ‘वर्धा शहर’ हा विधानसभा मतदारसंघ ‘वर्धा लोकसभा मतदारसंघा’चा एक भाग आहे. या मतदारसंघात सर्वाधिक प्रमाणात काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. काँग्रेसचे प्रमोद भाऊसाहेब शेंडे या मतदारसंघातून आतापर्यंत सहा वेळा निवडून आले आहेत. शेंडे १९७८ पासून सलग तीन वेळा जिंकून आले. मात्र, १९९० साली मानिक महादेव सबने यांनी अपक्ष निवडणूक लढवून त्यांचा पराभव केला. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा शेंडे जिंकून आले. त्यानंतर सलग दोन वेळा प्रमोद शेंडे निवडणूक जिंकून आले. मात्र, २००९ साली अपक्ष उमेदवार सुरेश बापूरावजी देशमुख यांनी त्यांचा पराभव केला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. पंकज राजेश भोयर यांनी प्रमोद शेंडे यांचे चिरंजीव शेखर शेंडे यांचा पराभव केला आणि वर्धा मतदारसंघात पहिल्यांदा भाजपला सत्ता मिळवता आली.

मतदारसंघ क्रमांक – ४७

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

पुरुष – १,५६,६७९
महिला – १,५०,३८५
एकूण मतदार – ३,०७,०६४

विद्यमान आमदार – डॉ. पंकज राजेश भोयर, भाजप

डॉ. पंकज राजेश भोयर हे वर्धा मतदारसंघाचे पहिले भाजपचे लोकप्रतिनिधी आहेत. ते उच्चशिक्षित आहेत. २०१० ते २०१२ ते वर्धा जिल्हा युवा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. २०१४ साली त्यांनी भाजपात प्रवेश केला. २०१४ साली त्यांना वर्धा जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाकडून देण्यात आली. त्याचबरोबर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. वर्ध्याच्या मतदारांनी डॉ. पंकज भोयर यांच्यावर विश्वास ठेवून भरघोस मतांनी निवडू दिले. या मतदारसंघात भाजपचा हा ऐतिहासिक विजय होता. कारण आतापर्यंत एकदाही भाजपला या मतदारसंघातून विजय मिळवता आला नव्हता.

विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) डॉ. पंकज भोयर, भाजप – ४५,८९७
२) शेखर शेंडे, काँग्रेस – ३७,३४७
३) निरज गुजर, बसप – २२,२८३
४) रविकांत बालपांडे, शिवसेना – १८,८६७
५) सुरेश देशमुख, राष्ट्रवादी – १८,१९२


हेही वाचा – ८ – वर्धा लोकसभा मतदारसंघ

First Published on: August 9, 2019 3:53 PM
Exit mobile version