पुण्यात ‘उलूक महोत्सव’

पुण्यात ‘उलूक महोत्सव’

पुण्यात 'घुबड महोत्सव'

‘घुबड’ या पक्ष्याच्या संवर्धनासाठी पुण्यातील पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे पहिल्या ‘उलूक’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २९ आणि ३० नोव्हेंबरला इला फाउंडेशनतर्फे हा महोत्सव भरवण्यात येत आहे. या महोत्सवात अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

या महोत्सवात १५० शाळांचा सहभाग

घुबड दिसले तर माणूस मरतो या अंधश्रद्धेतून त्याचे मढेपाखरू असे नामकरण करण्यात आले आहे. तसेच संस्कृत भाषेत घुबड पक्ष्याचे ‘उलूक’ या नावाने देखील ओळखले जाते. मात्र शेतातील उंदीर आणि घुशींच्या उपद्रवापासून शेतकऱ्यांची सुटका करणारे घुबड शेतकऱ्यांचा मित्र आहे. गैरसमजातून होणाऱ्या कत्तलींमुळे घुबडांच्या दोनशे बासष्ठ प्रजातींपैकी केवळ पंच्याहत्तर प्रजाती आढळून येतात. त्यातील सुमारे चाळीस प्रजाती महाराष्ट्रात आढळतात. त्यांचे संवर्धन करायचे असेल तर लहान मुलांची घुबडाशी मैत्री होणे आवश्यक आहे. याच विचारातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सुमारे दीडशे शाळांचे दहा हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. महोत्सवाआधी केलेल्या आवाहनातून विद्यार्थ्यांनी तयार केलेली बाराशे चित्रे, पोस्टर, शिल्प, काष्ठशिल्पांचे प्रदर्शन या महोत्सवामध्ये भरविण्यात येणार असल्याची माहिती इला फाउंडेशनचे संस्थापक आणि पक्षी तज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी दिली आहे.


वाचा – महिलांना आकर्षित करण्यासाठी त्याने घुबडाचा बळी दिला


 

First Published on: November 28, 2018 6:31 PM
Exit mobile version