देशात १०० कोटी चलनी नाणी बनणार: २० रुपायांचही नाण येणार

देशात १०० कोटी चलनी नाणी बनणार: २० रुपायांचही नाण येणार

नाशिकरोड : आझादी का अमृत महोत्सवअंतर्गत केंद्र सरकारने एसएमपीसीएलला देशातील मुंबई, कोलकाता, हैद्राबाद व नोयडा येथील टाकसाळ कारखान्यांना १, २, ५, १० व २० रुपयांचे १००० मिलियन नाणे तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहे. ही नाणे बनवण्यासाठी विशेष सिरीज सुरु करण्यात आली आहे.

सिक्युरिटी प्रिंटींग अ‍ॅन्ड मिंटींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत देशातील मुंबई, कोलकाता, हैदराबाद व नोयडा येथील टाकसाळींना १ रुपयांचे १०० मिलियन, २ रुपयांचे ३०० मिलियन, ५ रुपयांचे ३०० मिलियन, १० रुपयांचे १०० मिलियन व २० रुपयांचे २०० मिलियन चलनी नाणी बनविण्याचे आदेश दिले आहे. आझादी का अमृत महोत्सव सुरु असल्याने या निमित्ताने केंद्र सरकारने या स्पेशल सिरिज साठी (AKAM) coins for FY-2022-23 असे नाव देण्यात आले आहे. सिक्युरिटी प्रिंटींग अ‍ॅन्ड मिंटींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड चे प्रबंधक अमित कुमार सिंह यांचे संमतीचे पत्र वरिल कारखान्यांना प्राप्त झाले आहे.

First Published on: June 16, 2022 12:50 PM
Exit mobile version