खडसेंचा धमाका : माझ्यासोबत १५ माजी आमदार

खडसेंचा धमाका : माझ्यासोबत १५ माजी आमदार

माझ्या पाठीशी १५ ते १६ माजी आमदार आहेत. ते शुक्रवारी माझ्यासोबत मुंबईत येणार आहेत. काही विद्यमान आमदारही सोबत आहेत, पण पक्षांतर बंदी कायद्यामुळे त्यांना पक्ष सोडण्यास अडचण असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरात पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्या भागात नेतृत्त्व नसल्यानेच मी राष्ट्रवादीची निवड केल्याचेही स्पष्ट केले.

खडसेंच्या या वक्तव्याने भाजपअंर्तगत खळबळ उडाली आहे. दरम्यान, खडसे हे मुक्ताईनगर येथून हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना झाले. त्यांच्यासाबत जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसेदेखील आहेत. याशिवाय खडसे यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी जळगावहून वाहनाने अनेक कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत.

First Published on: October 22, 2020 7:44 PM
Exit mobile version