१११ दिव्यांगांनी सर केले महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर

१११ दिव्यांगांनी सर केले महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर

अकोले : शिव ऊर्जा प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर आयोजित 111 दिव्यांगांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर सर केला. या मोहिमेअंतर्गत राज्यातील बहुविकलांग दिव्यांग बांधव-भगिनी सहभागी झाल्या होत्या.

शिव ऊर्जा दिव्यांग गड किल्ले भ्रमण व संवर्धन संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना प्रेरणा देण्यासाठी, त्यांकगे आयुष्यात चैतन्य निर्माण करण्यासाठी शिवाजी गाडे, कचरू चांभारे सर यांचे प्रहार दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून अनेक दिव्यांग जोडले गेले आहेत. याचाच एक भाग म्हणून नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी व 3 डिसेंबर 2022 रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आले. त्यानिमित्त जल्लोष साजरा करण्यासाठीची ही विशेष मोहीम राबविण्यात आली. अकोले तालुक्यातील विविध गड किल्ले सर करणारे केशव भांगरे, पंचायत समिती अकोले, किशोर धुमाळ, अकोले महाविद्यालयचे ज्ञानेश्वर साहेबराव डगळे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

First Published on: January 4, 2023 9:40 AM
Exit mobile version