११२ नवे रूग्ण : नाशिकमध्ये ९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू

११२ नवे रूग्ण : नाशिकमध्ये ९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि.२९) दिवसभरात 1१२ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक ग्रामीण 46 आणि नाशिक शहरातील 112 रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 9 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिक शहर 5, नाशिक ग्रामीण 3 आणि मालेगाव एका रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 4 हजार 43 रूग्ण असून एकट्या नाशिक शहरात २ हजार ४० रूग्ण आहेत.

नाशिक शहरात करोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. नाशिक शहरात सोमवारी (दि.२९) ५ बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून नाशिक शहरात बाधित मृतांची संख्या शंभरीपार झाली आहे तर नव्याने ११२ रूग्ण आढळून आल्याने नाशिक शहर रूग्ण २ हजारीपार झाली आहे. त्यामुळे शहरातील रूग्णालये हाऊसफुल होवू लागली आहेत. रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी ५४ टक्के रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आजवर 2 हजार 194 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण 459, नाशिक शहर 852, मालेगाव 807 आणि जिल्ह्याबाहेरील 76 रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात १ हजार ६१५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यात नाशिक ग्रामीण 344, नाशिक शहर 1084, मालेगाव 150 आणि जिल्ह्याबाहेरील 37 रूग्णांचा समावेश आहे.

रूग्णालयनिहाय उपचार घेणारे पॉझिटिव्ह रूग्ण
जिल्हा रूग्णालय 7५,
नाशिक महापालिका रूग्णालये 1093,
डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय 10९,
मालेगाव रूग्णालय ७७,
नाशिक ग्रामीण रूग्णालय 18०
गृह विलगीकरण ८१

दिवसभरात 4९४ संशयित रूग्ण दाखल
जिल्ह्यात एकूण २१ हजार २८०
जिल्हा रूग्णालय ११, नाशिक महापालिका रूग्णालय २७५, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय 3, मालेगाव रूग्णालय १५, नाशिक ग्रामीण रूग्णालय 1८३, गृह विलगीकरण ७)

नाशिक करोना अपडेट
पॉझिटिव्ह रूग्ण-4043 (मृत-2३४)
नाशिक ग्रामीण-8४८ (मृत-4५)
नाशिक शहर-२०४० (मृत-१०४)
मालेगाव शहर-10३१ (मृत-7४)
जिल्ह्याबाहेरील-124 (मृत-11)

First Published on: June 29, 2020 9:23 PM
Exit mobile version