Coronavirus : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १२२१ गुन्ह्यांची नोंद; २ कोटी ८२ लाखाचा मुद्देमाल जप्त

Coronavirus : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १२२१ गुन्ह्यांची नोंद; २ कोटी ८२ लाखाचा मुद्देमाल जप्त

Drinking

लॉकडाउन काळात राज्यातील मद्य विक्रीची दुकाने बंद आहेत. या कालावधीत  अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कार्यवाही केली आहे. कारवाई अंतर्गत ३ एप्रिलपर्यंत राज्यात एकूण १२२१ गुन्हे नोंद तर एकूण रु. २,८२,३१,१०२/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच ३६ वाहने जप्त केली असून ४७२ आरोपींना अटक करण्यात आले आहे.
महाराष्ट्राशेजारील राज्यांमधून महाराष्ट्रात होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी  विभाग २४ तास कार्यरत आहे. त्यानुसार नाकाबंदी केली असून गोवा, दादरा- नगर हवेली, दीव- दमण, कर्नाटक व मध्य प्रदेश राज्यातून अवैध मद्य येणार नाही. याकरिता १२ कायमस्वरूपी आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी  तपासणी करीत आहेत. तसेच १८ तात्पुरते सीमा तपासणी नाके देखील उभारण्यात आले आहेत.
अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार करण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४×७ सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्या चे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. त्यासाठी टोल फ्री क्रमांक  १८००८३३३३३३  व्हाट्सअँप क्रमांक ८४२२००११३३
आणि ई-मेल commstateexcise@gmail.com असा आहे. नमूद क्रमांकावर अवैधमध्ये विरुद्ध तक्रार नोंदविण्यात यावी, असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात येत आहे.
First Published on: April 5, 2020 2:36 PM
Exit mobile version