पुणे : कोरोनाचा धोका वाढतोय; एका दिवसात १४ रुग्णांचा मृत्यू

पुणे : कोरोनाचा धोका वाढतोय; एका दिवसात १४ रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पुण्यात एका दिवसात १४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. पुण्यात आतापर्यंत ४३९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एका दिवसात २५४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील रुग्णांची संख्या ९ हजार ३३६ वर पोहोचली आहे. दरम्यान, पुण्याचा मृत्यूदर हा देशाच्या मृत्यूदरपेक्षा सर्वाधिक आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता अधिक वाढली आहे.

६ हजार ८७ रुग्ण झाले बरे

पुण्यात शनिवारी दिवसभरात १६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत ६ हजार ८७ रुग्ण बरे झाले आहेत. तर २ हजार ८१० अॅक्टिव्ह रुग्ण असून २०८ रुग्ण क्रिटिकल आणि ४७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

राज्यात ३,४२७ कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून आज सलग तिसऱ्या दिवशी राज्यात ३ हजाराहून जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत. आज दिवसभरात राज्यात ३ हजार ४२७ नवे रुग्ण सापडले असून आता एकूण रुग्णसंख्या १ लाख ४ हजार ५६८ झाली आहे. यापैकी ५१ हजार ३७९ रुग्ण अॅक्टिव्ह असून ४९ हजार ३४६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, चिंतेची बाब म्हणजे आज राज्यात ११३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आता एकूण मृतांचा आकडा ३ हजार ८३० इतका झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यापासून वाढत असलेल्या रुग्णसंख्येला आवर कसा घालायचा? असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.


हेही वाचा – दोन महिन्याच्या कोरोनाग्रस्त बालकाचा मृत्यू; माहिती लपवण्याचा प्रयत्न


 

First Published on: June 14, 2020 9:41 AM
Exit mobile version