नाशिकमध्ये 14 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

नाशिकमध्ये 14 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि.11) दिवसभरात 242 नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक ग्रामीण 74,  नाशिक 144,  मालेगाव 23 आणि जिल्ह्याबाहेरील एकाचा समावेश आहे. दिवसभरात 14 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यात नाशिक शहर 11 आणि नाशिक ग्रामीण 3 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 6 हजार 721 कोरोना बाधितरुग्ण असून नाशिक शहरात 3 हजार 864 रुग्ण आहेत.
     नाशिक जिल्ह्यात आजवर 4 हजार 270 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण 986, नाशिक शहर 2264, मालेगाव 920 आणि जिल्ह्याबाहेरील 100 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या 2 हजार 125 रुग्णांवर उपचार सुरू आहे. यात नाशिक ग्रामीण 524, नाशिक शहर 1435, मालेगाव 142 आणि जिल्ह्याबाहेरील 24 रुग्णांचा समावेश आहे. शनिवारी दिवसभरात 819 संशयित रूग्ण दाखल झाले. यात जिल्हा रूग्णालय 7, नाशिक महापालिका रूग्णालय 606, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय 4, मालेगाव रूग्णालय 10, नाशिक ग्रामीण रूग्णालयात 165 रुग्ण दाखल झाले आहेत.
नाशिक कोरोना अपडेट
पॉझिटिव्ह रूग्ण-6721 (मृत-326)
नाशिक ग्रामीण-1579 (मृत-69)
नाशिक शहर-3864 (मृत-165)
मालेगाव शहर-1141 (मृत-79)
जिल्ह्याबाहेरील-137 (मृत-13)
First Published on: July 11, 2020 7:51 PM
Exit mobile version