पाक-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅचवर बेटिंग करणाऱ्या दोघांना अटक

पाक-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅचवर बेटिंग करणाऱ्या दोघांना अटक

बेटिंगसाठी वापरणाऱ्या वस्तू जप्त केल्या

पिंपरी-चिंचवडमध्ये टी २० क्रिकेट सामन्यावर बेटिंग करणाऱ्या दोन जणांना पिंपरी पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण २ लाख २३ हजार रुपयांचे जुगार खेळायला लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यांच्यावर मुंबई जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून ही कारवाई रात्री उशिरा करण्यात आली. राम गोवर्धन बजाज (वय – ४४, रा. राम पार्क वैभव नगर पिंपरी) आणि गोविंद प्रभूदास लालवानी (वय – ४१, रा. वैष्णवदेवी मंदिर जवळ पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

मुद्देमालासह अटक 

पिंपरी पोलिसांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, पिंपरीमधील वैभव नगर येथे राहत्या घरात काहीजण क्रिकेट सामन्यावर बेटिंग करत आहेत. त्यानुसार दोन अधिकारी आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांनी घरावर छापा मारत दोघांना अटक केली. आरोपी राम गोवर्धन बजाज यांच्या घरी पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या खेळत असलेल्या टी-२० सामन्यावर बेटिंग सुरू होती. त्यांच्याकडे १६ मोबाईल, लॅपटॉप, चार्जर, टीव्ही आदी साहित्य होते.

पिंपरी पोलिसांनी केली कारवाई 

विनापरवाना, बेकायदेशीररित्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यावर बेटिंग करत असताना दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली. तसेच त्यांच्याकडून एकूण २ लाख २३ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

First Published on: October 29, 2018 5:23 PM
Exit mobile version