Corona: २४ तासांत १३७ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; २ जणांचा मृत्यू

Corona: २४ तासांत १३७ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; २ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र पोलीस

देशभरासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. बुधवारी आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत १० हजार ३०९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३३४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर कोरोना योद्धा म्हणून नागरिकांचे रक्षण करणारे महाराष्ट्र पोलीस देखील कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. गेल्या २४ तासात १३७ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाची लागण झाली असून त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

यामुळे कोरोना संक्रमित झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आकडा वाढून १० हजार १६३ वर पोहोचला आहे. यापैकी सध्या १ हजार ८६५ अॅक्टिव्ह कोरोना रूग्ण पोलीस असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला असून मृतांचा आकडा १०९ झाला असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख ६८ हजार २६५ वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत १६ हजार ४७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार १६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ५ हजार ५२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.२५ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यदर ३.५२ टक्के एवढा आहे. सध्या राज्यातील १ लाख ४५ हजार ९६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तर देशात या जीवघेण्या विषाणूमुळे ४० हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत म्हणजेच बुधवारी सकाळी ८ ते ८ या काळात देशभरात कोरोना विषाणूमुळे ९०४ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे ४० हजार ६९९ लोकांचा मृत्यू झाला आहे.


Mumbai Police Salute : मनोधैर्य वाढवा, खच्चीकरण करू नका; सुप्रिया सुळे यांचे सुचक ट्विट

First Published on: August 6, 2020 1:12 PM
Exit mobile version