फिरायला गेलेली दोन कुटुंब बेपत्ता

फिरायला गेलेली दोन कुटुंब बेपत्ता

मगर आणि सातव कुटुंब

पुण्यातील खडकवासला येथे फिरायला गेलेली दोन कुटुंब कालपासून बेपत्ता असल्याने खळबळ माजली आहे. सातव आणि मगर कुटुंब खडकवासलाच्या एका हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. बुधवारी सकाळी ११ पर्यंत त्यांचे इतर कुटुंबियांशी बोलणे झाले. पण त्यानंतर कुटुंबातील एकाशीही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांनी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आता या दोन्ही कुटुंबाचा शोध पोलीस घेत आहेत.

नेमकं काय झालं?

पुण्यातील हडपसर परीसरात सातव आणि मगर कुटुंब राहते. सिद्धार्थ / हरीश मगर आणि जगन्नाथ सातव हे दोघं आपल्या कुटुंबासह मंगळवारी खडकवासला, पानशेतला फिरायला गेले होते. खडकवासलापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अॅक्वेरिअस हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला. बुधवारी दुपारी सिद्धार्थ मगर यांच्या पत्नीचे बहिणीशी सकाळी ११ च्या दरम्यान बोलणे झाले. पण त्यानंतर कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही. त्यांचे फोन बंद असल्याचे देखील कुटुंबियांनी पोलिसांनी सांगितले. त्यामुळे बुधवारी रात्री उशीरापर्यंत या कुटुंबाच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली. त्यांचा शोध न लागल्याने नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

सात जण बेपत्ता

मगर आणि सातव परिवार मिळून एकूण ७ जण बेपत्ता झाली आहे. यात मगर कुटुंबातील सिद्धार्थ, पत्नी स्नेहल मगर, जुळ्या मुली आरंभी आणि साईली यांचा समावेश आहे. तर सातव कुटुंबातील जगन्नाथ सातव, त्यांची पत्नी आणि त्यांचा पाच वर्षाचा मुलगा यांचा समावेश आहे, या सिद्धार्थ आणि जगन्नाथ दोघांचा जमीन खरेदी- विक्रीचा व्यवसाय आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

First Published on: August 23, 2018 12:07 PM
Exit mobile version