माणगावच्या क्रिप्झो कंपनीतील सिलिंडरच्या स्फोटात २ जणांचा मृत्यू

माणगावच्या क्रिप्झो कंपनीतील सिलिंडरच्या स्फोटात २ जणांचा मृत्यू

रायगडच्या माणगाव तालुक्यातील विळे भागाड औद्योगिक वसाहतीत क्रिप्झो इंजिनिअरिंग कंपनीत काल, शुक्रवारी सायंकाळी सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात त्यात १७ जण जखमी झाले. यातील ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात होते. मात्र यातील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजते. आशिष येरूनकर आणि राकेश हळदे, असे त्या मृत तरुणांचे नाव आहे. स्फोटात जखमी झालेल्यांना मुंबईतील जे. जे. रूग्णालयात हलवण्यात आले होते. तर उर्वरित जखमींवर माणगावचे उप जिल्हा रुग्णालय, तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या कंपनीत ऑक्सिजनचे सिलिंडर तयार केले जातात. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास अचानक एका सिलिंडरचा स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला. यात १७ कामगार भाजले. हा स्फोट नेमका कोणत्या तांत्रिक बिघाडामुळे झाला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच रात्रभर संपूर्ण गावकरी हॉस्पिटलच्या बाहेर जमले होते.

हेही वाचा –

माणगावच्या क्रिप्झो कंपनीत सिलिंडरचा स्फोट; १७ कामगार भाजले

First Published on: November 16, 2019 11:25 AM
Exit mobile version