चिंताजनक! गेल्या २४ तासांत २३२ पोलिसांना कोरोनाची लागण

चिंताजनक! गेल्या २४ तासांत २३२ पोलिसांना कोरोनाची लागण

संपूर्ण देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता अहोरात्र मेहनत करणाऱ्या पोलिसांनबाबत कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. गेल्या २४ तासांत २३२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी १० हजार ३२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

९ हजार ४४९ पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित

राज्यात आतापर्यंत ९ हजार ४४९ पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. तर ९७१ पोलीस अधिकारी तर ८ हजार ४७८ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान. सध्या राज्यात २१९ पोलीस अधिकारी आणि १ हजार ७१३ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत ७ हजार ४१४ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. तर धक्कादायकबाब म्हणजे आतापर्यंत ९ पोलीस अधिकारी आणि ९४ पोलीस कर्मचारी मिळून अशा एकूण १०३ पोलिसांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

देशात रिकव्हरी रेट वाढला

भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण-रिकव्हरी रेट ६४. ५३ टक्के इतका झाला आहे. तर सुरुवातीच्या काळात भारतात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर घेण्यात आलेल्या ल़कडाऊन दरम्यान देशात रिकव्हरी रेट हा सर्वात कमी म्हणजे २.१५ टक्के होता. मात्र, आता जून महिन्याच्या दरम्यान हा रिकव्हरी रेट ३.३३ टक्के झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


हेही वाचा – देशात गेल्या २४ तासांत ५७,११७ नवे रूग्ण; ७६४ जणांचा मृत्यू


 

First Published on: August 1, 2020 4:47 PM
Exit mobile version