Maharashtra Assembly Budget Session 2021: अधिवेशनावर कोरोनाचं सावट, २५ जण कोरोना पॉझिटिव्ह

Maharashtra Assembly Budget Session 2021: अधिवेशनावर कोरोनाचं सावट, २५ जण कोरोना पॉझिटिव्ह

Maharashtra Budget Session 2021: अधिवेशनावर कोरोनाचं सावट, २५ जणांना कोरोनाची लागण

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. १ ते १० मार्चपर्यंत असे दहा दिवस अधिवेशन होणार आहे. पण अधिवेशनावर कोरोनाचं सावट कायम आहे. अधिवेशनच्याआधी २५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये २३ पोलीस कर्मचारी असून २ पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. माहितीनुसार सुदैवाने एकही आमदार कोरोना पॉझिटिव्ह आले नाही आहेत.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. दहा दिवसांचे अधिवेशन असणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प ८ मार्चला सादर होणार आहे. तर ९ आणि १० मार्चला बजेटवर चर्चा होणार आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे. या दहा दिवसांमध्ये दोन वेळा कोरोनाची चाचणी केली होणार आहे.

दहा दिवसांमधील पाच दिवस झाल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाची चाचणी केली जाईल. ज्यामुळे झालेल्या पाच दिवसांमध्ये कोणाला कोरोनाची लागण झाले आहे की नाही? हे स्पष्ट होईल. आजपासून अधिवेशनला सुरुवात होत असल्यामुळे शनिवारी आणि रविवारी कोरोनाची चाचणी करण्यात आली. आता पाच दिवस झाल्यानंतर म्हणजे ८ मार्च ते १० मार्चच्या कामकाजासाठी ६ आणि ७ मार्चला कोरोनाची दुसरी चाचणी केली जाणार आहे.

शनिवारी आणि रविवारी झालेल्या एकूण ३ हजार २०० जणांची कोविड चाचणी करण्यात आली असून त्यापैकी २५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये २३ पोलीस कर्मचारी आणि २ पत्रकारांचा समावेश आहे.


हेही वाचा – Maharashtra Budget Session Live Updates: इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचे ‘सायकल आंदोलन’


 

First Published on: March 1, 2021 10:03 AM
Exit mobile version