गुरुवारी राज्यात २५९८ नवे रुग्ण; ८५ जणांचा मृत्यू

गुरुवारी राज्यात २५९८ नवे रुग्ण; ८५ जणांचा मृत्यू

राज्यात गुरुवारी २५९८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, करोनाबाधित रुग्णांची संख्या ५९ हजार ५४६ झाली आहे. तर राज्यात ८५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या १९८२ वर पोहचली आहे. असे असले तरी राज्यातील करोना मृत्यू दर ३. ३२ टक्के इतका आहे. तसेच ६९८ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने आजपर्यंत १८ हजार ६१६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३१.२६ टक्के एवढे आहे.

राज्यात ८५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यामध्ये मुंबई ३८, वसई विरार ४, ठाणे ४, नवी मुंबई २, रायगड १, जळगाव १, पुणे मनपा १०, सातारा ९, सोलापूर मनपा ७, औरंगाबाद ३, नांदेड मनपा १, अकोला मनपा ५ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६० पुरुष तर २५ महिला आहेत. ८५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४५ रुग्ण आहेत तर ३१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ९ जण ४० वर्षांखालील आहे. या ८५ रुग्णांपैकी ४५ जणांमध्ये ( ५३ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूपैकी ३७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १५ मे ते २५ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ४८ मृत्यूंपैकी मुंबई २२, सोलापूर -५ , अकोला ४, औरंगाबाद ३, सातारा -३, ठाणे -३, वसई विरार -३, जळगाव -१, नांदेड -१, नवी मुंबई -१, पुणे -१ आणि रायगड येथील १ मृत्यू आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४,१९,४१७ नमुन्यांपैकी ५९,५४६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या कंटेनमेंट २८१६ झोन क्रियाशील असून आज एकूण १७,२११ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६५.६१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ६,१२,७४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५,१२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: May 29, 2020 6:26 AM
Exit mobile version