पुण्याच्या आयटी हबमध्ये अंमली पदार्थांची खुलेआम विक्री; ६ लाखांचा गांजा जप्त

पुण्याच्या आयटी हबमध्ये अंमली पदार्थांची खुलेआम विक्री; ६ लाखांचा गांजा जप्त

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर देशात अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाया करायला सुरुवात केली आहे. आज पुण्यातील हिंजवडीतील आयटी हबमध्ये कारवाई करत तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांचा २५ किलो गांजा जप्त केला आहे.

पुण्यातील राजीव गांधी आयटी पार्क हिंजवडी फेज २ येथे एक तरुण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी रचून गांजा विक्रेत्या तरुणाला अटक केली. त्याच्याकडून तब्बल २५ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. हा गांजा ६ लाख ४० हजार रुपयांचा आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी शाकिर जेनेडी आणि संदिप पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आहे. अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आली आहेत. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रित सिंह यांचं नाव समोर आलं असून एनसीबीने या सर्वांना चौकशीसाठी बोलावलं आहे.

 

First Published on: September 24, 2020 3:54 PM
Exit mobile version