नाशिकमध्ये २६३ नवे रूग्ण पॉझिटिव्ह

नाशिकमध्ये २६३ नवे रूग्ण पॉझिटिव्ह

नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि.१) दिवसभरात तब्बल २६३ नवीन रूग्ण करोनाबाधित आढळून आले. यात नाशिक शहर १८५, नाशिक ग्रामीण ६२, मालेगाव १० आणि जिल्ह्याबाहेरील ६ रूग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नाशिक शहरात पहिल्यांदाच एकाच दिवशी १८५ नवे रूग्ण बाधित आढळून आले असून दिवसभरात नाशिक शहरात दोन करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण 4 हजार ३७७ करोनाबाधित रूग्ण असून एकट्या नाशिक शहरात २ हजार २६५ रूग्ण आहेत.

नाशिक शहरात करोनाने धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस शहरात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य विभाग हादरून गेला आहे. बुधवारी शहरात दोन बाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. अहमद रजा मजिद, गुलशन कॉलनी, पखाल रोड,नाशिक येथील ३८ वर्षीय पुरुष २० जून रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला होता. त्यांचे २९ जून रोजी मृत्यू झाला. उपनगर येथील ७५ वर्षीय वृद्ध महिला २८ जून रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली होती. त्यांचा ३० जून रोजी मृत्यू झाला. जिल्ह्यात आजवर 2 हजार 455 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण 524, नाशिक शहर 1029, मालेगाव 820, जिल्ह्याबाहेरील 82 रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 646 संशयित रूग्ण विविध रूग्णालयांमध्ये दाखल झाले. यात जिल्हा रूग्णालय 13, नाशिक महापालिका रूग्णालये 436, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय 13, मालेगाव रूग्णालय 11, नाशिक ग्रामीण रूग्णालय 164 आणि गृह विलगीकरण 9 रूग्णांचा समावेश आहे.

नाशिक शहर पोलीस दलात करोनाचा पहिला बळी
नाशिक ग्रामीण पोलीस दलापाठोपाठ नाशिक शहर पोलीस दलात करोनाने शिरकाव केला आहे. शहर पोलीस दलात १२ कर्मचारी करोनाबाधित असून ७ करोनामुक्त झाले आहेत. शहर पोलीस दलातील ५३ वर्षीय पोलीस कर्मचार्‍याचा करोनामुळे मृत्यू झाला असून हा शहर पोलीस दलातील करोनाचा पहिला बळी आहे. ते इंदिरानगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांची २० दिवसांपुर्वी प्रकृती खालावली. तेंव्हापासून ते रजेवर होते. खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतानाही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांनी पुढील उपचारार्थ मुंबईतील अंधेरी येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा मंगळवारी (दि.३०) रात्री ८ वाजेदरम्यान मृत्यू झाला.

नाशिक करोना अपडेट
पॉझिटिव्ह रूग्ण-4३७७ (मृत-2४०)
नाशिक ग्रामीण-941(मृत-47)
नाशिक शहर-2265 (मृत-107)
मालेगाव शहर-1041(मृत-75)
जिल्ह्याबाहेरील-130 (मृत-11)

First Published on: July 1, 2020 8:26 PM
Exit mobile version