Maharashtra Corona Update: महाराष्ट्रात आज कोरोना रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ; ओमिक्रॉनबाधितांची सेंच्युरी

Maharashtra Corona Update: महाराष्ट्रात आज कोरोना रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ; ओमिक्रॉनबाधितांची सेंच्युरी

Maharashtra Corona Update: महाराष्ट्रात आज कोरोना रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ; ओमिक्रॉनबाधितांची सेंच्युरी

महाराष्ट्र सध्या कोरोनाबाधितांची संख्या इतकी झपाट्याने वाढत आहे की पुन्हा दुसऱ्या लाटेप्रमाणे परिस्थिती होतेय की का? अशी भीती सर्वांच्या मनात निर्माण झाली आहे. त्याच्यात कोरोनाचे नवे रुप ओमिक्रॉन देखील तितक्याचे वेगाने पसरत आहे. काल, मंगळवारी महाराष्ट्रात १८ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची आणि ७० हून अधिक ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली होती. मात्र महाराष्ट्राची आजची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात २६ हजार ५३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून १४४ ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. तसेच आज दिवसभरात ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आणि ५ हजार ३३१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आता महाराष्ट्रातील सक्रीय रुग्णांची संख्या ८७ हजार ५०५वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ होत असल्यामुळे आता स्थानिक पातळीवर निर्बंध लावण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे नंतर आज नागपूर प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत अशीच उच्चांकी वाढ झाली तर ठाकरे सरकार कडक निर्बंध लावण्याची शक्यता आहे. आता महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६७ लाख ५७ हजार ३२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४१ हजार ५८१ जणांचा मृत्यू झाला असून ६५ लाख २४ हजार २४७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

तसेच आतापर्यंत मुंबईसह पुणे, नागपूर, पनवेल, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद अशा अनेक जिल्ह्यांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाला आहे. आज ओमिक्रॉनचे १४४ रुग्ण आढळले असून यामधील एकट्या मुंबईत १०० ओमिक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच नागपूरमध्ये ११, ठाणे मनपा आणि पुणे मनपा ७, पिंपरी-चिंचवड ६, कोल्हापूर ५, अमरावती, उल्हासनगर आणि भिवंडी निझामपूर येथे प्रत्येकी २, पनवेल आणि उस्मानाबादमध्ये प्रत्येकी १ ओमिक्रॉनबाधित आढळला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ७९७ ओमिक्रॉनबाधित आढळले असून यापैकी ३३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.


हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबई लॉकडाऊनच्या दिशेने; आज दिवसभरात १५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद


 

First Published on: January 5, 2022 8:28 PM
Exit mobile version