विशेष : छेडछाडीतून २७ टक्के मुलींची शाळा बंद; ‘शोधिनी’चा सर्व्हे

विशेष : छेडछाडीतून २७ टक्के मुलींची शाळा बंद; ‘शोधिनी’चा सर्व्हे

नाशिक : छेडछाडीच्या प्रसंगामुळे २७ टक्के मुलींची शाळा बंद होते. तर १९ टक्के मुलींना नोकरी-व्यवसाय करता येत नाही आणि १२ टक्के मुलींचे लग्न लावून दिले जाते असा महत्वपूर्ण निष्कर्ष अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट या सामाजिक संस्थेच्या शोधिनी कृती संशोधनातून समोर आला आहे. विशेष म्हणजे शोधिनीच्या मुली व मुलांनी २५ गावांमधील मुलींचे संशोधन केले.

या संशोधनातून महिलांसाठी राज्यातील वातावरण कशा स्वरुपाचे आहे, याचा अंदाज बांधणे शक्य होते. ४७ टक्के मुलींना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटत नाही. तर ५८ टक्के मुली घराबाहेर एकट्या फिरु शकत नसल्याचा निष्कर्ष यातून समोर आला.१३ टक्के मुली म्हणतात की छेडछाडीच्या घटनांचा दोष मुलींनाच दिला जातो. या भीतीमुळॅ मग मुली अशा घटना घरी सांगण्यास लाजतात. या संशोधनातील निष्कर्ष पुढीलप्रमाणे-

शोधिनीचा जाहीरनामा 

 

पुढे शिकायला जोडीदारीन नव्हती म्हणून शाळा सोडली.

विद्यार्थिनींचे शाळेतील प्रमाण कमी होण्यामागील कारणांचा शोध घेतला असता पुढे शिकायला जोडीदारीन नसल्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागल्याचे वास्तव आजही गावा-गावांमध्ये बघायला मिळते. ‘अभिव्यक्ती’ने केलेल्या या महत्वपूर्ण संशोधनातून शासकीय पातळीवर काही उपयोग व्हायला हवा. अन्यथा आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचितच राहतील. त्यांच्या स्वातंत्र्याचा विचार व्हायलाच हवा. नाही तर हे संशोधन निरुपयोगी ठरेल.

First Published on: October 12, 2022 1:41 PM
Exit mobile version