लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी; ३ जणांना अटक

लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी; ३ जणांना अटक

प्रातिनीधीक फोटो

अहमदनगरमधील एसीसीएम या लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथे हे लष्कराचे प्रशिक्षण केंद्र आहे. अटक करणारे आरोपीमधील दोन जण उत्तरप्रदेशच्या मिर्झापूरचे आहेत तर एक जण अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या आरोपींविरोधात भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी एक जण लष्कराच्या गणवेशात होता. त्यामुळे हे प्रकरण लष्कराने गांभिर्याने घेतलं आहे. अटक केलेल्या आरोपींची चौकशी पोलिसांकडून सुरु आहे.

तिघांना अटक

भिंगार येथील लष्कराच्या प्रशिक्षण केंद्राच्या कॅम्प भागामध्ये हे तीन आरोपी गुरुवारी रात्री संशयितरित्या फिरत होते. या सर्व आरोपींकडे लष्कराचे कार्ड सापडले तर एकाने लष्कराचा गणवेश परिधान केला होता. संशयितरित्या फिरत असल्याने एका लष्करी अधिकाऱ्याने त्यांना अडवून विचारणा केली. मात्र त्यांनी योग्य उत्तरं दिली नाहीत. त्यानंतर या तिघांना भिंगार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. प्रदीप शिंदे, रिझवान एजाज अली आणि सोनू नायजुद्दीन चौधरी अशी या अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

पोलिसांकडून चौकशी सुरु

पोलीस चौकशी दरम्यान हे तिघे जण प्रशिक्षण केंद्रात कसे आले याचे योग्य उत्तर दिले नाही. तसंच या आरोपींकडून पोलिसांनी लष्कराचा गणवेश आणि लष्कराचे बनावट कार्ड सापडले. त्यामुळे याप्रकरणात भिंगारे पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात घुसखोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणात पोलिसांचा तपास सुरु आहे.

First Published on: January 4, 2019 3:43 PM
Exit mobile version