राज्यात ३,६७० नवे रुग्ण, ३६ जणांचा मृत्यू

राज्यात ३,६७० नवे रुग्ण, ३६ जणांचा मृत्यू

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ, मुंबईत २४ तासात ६७६ तर राज्यात १ हजार कोरोनाबाधितांची नोंद

शुक्रवारी राज्यात ३,६७० नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २०,५६,५७५ झाली आहे. राज्यात शुक्रवारी एकूण ३१,४७४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, कोरोना रुग्णांची संख्या ५१४५१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५ टक्के एवढा आहे.

राज्यात शुक्रवारी ३६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४, ठाणे, २, रायगड २, नाशिक २, सोलापूर ४, सिंधुदुर्ग २, औरंगाबाद २ आणि यवतमाळ ४ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ३६ मृत्यूंपैकी १९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४ मृत्यू रायगड २, ठाणे १ आणि अमरावती १ असे आहेत.

शुक्रवारी २,४२२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९,७२,४७५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९१ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५२,१९,४१६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,५६,५७५ (१३.५१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,६८,०८७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १,७८९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: February 12, 2021 9:47 PM
Exit mobile version