वर्धा जिल्ह्यात पावसाचा कहर; ४ जण गेले वाहून

वर्धा जिल्ह्यात पावसाचा कहर; ४ जण गेले वाहून

राज्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यात पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. दरम्यान विदर्भातील वर्धा जिल्ह्याला मुसळधार पावसाने नाल्याला पूर आल्याने या पुरात चार जण वाहून गेले आहेत. या सगळ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत.

नेमके काय घडले?

वर्धा जिल्ह्यातील नसोनेगाव आष्टा रोडवर शुक्रवारी सायंकाळच्या वेळेस ही घटना घडली आहे. शेतातून कामाकरुन घरी परत जात असताना अचानक पूर आला. पूर आल्याने काही पुरुष मजूर आणि महिला बैलगाडीच्या सहाय्याने रस्ता पार करत होते. अचानक बैलगाडी नाल्याच्या पुलावर आलेल्या पाण्यात फसली गेली. त्यावेळी बैलगाडीतील दोन महिला पाण्यात फेकल्या गेल्यात आणि त्या पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेल्या. नाल्याला प्रचंड पाणी असल्याने आणखी दोघे वाहून गेलेत. या चार जणांमध्ये दोन महिला, एक पुरुष आणि एका मुलाचा समावेश होता. या मुलाची ओळख अद्याप पटलेली नाही.

या चौघांचे मृतदेह रात्री उशिरा हाती लागले असून सोनेगाव स्टेशन येथील चंद्रकला लोटे आणि तळेगाव टालाटूले येथील बेबी भोयर अशी मृतांची नावे आहेत. तर सकाळी सोनेगाव येसंबा येथून येणाऱ्या नाल्यात गोजी येथे १२ वर्षीय मुलाचा आणि एका पुरुषाचा मृतदेह सापडला. दरम्यान, या दोघांची ओळख पटलेली नाही.


हेही वाचा – तळकोकणात पावसाने झोडपलं, २७ गावांचा संपर्क तुटला


 

First Published on: July 4, 2020 4:45 PM
Exit mobile version