मुंबईत कृष्ठरोगाचे ४१ रुग्ण तर राज्यात ३ हजार

मुंबईत कृष्ठरोगाचे ४१ रुग्ण तर राज्यात ३ हजार

प्रातिनिधिक फोटो

मुंबईसह राज्यात राबवलेल्या ‘कृष्ठरोग शोध मोहिमे’त मुंबईत कृष्ठरोगाचे एकूण ४१ रुग्ण आढळले आहेत, तर राज्यात एकूण ३००० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर १६ हजार संशयीत रुग्ण आढळले आहेत. राज्य आरोग्य विभागातर्फे २४ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबरपर्यंत ही मोहिम राबवण्यात आली होती‌. राज्य आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ” राष्ट्रीय कृष्ठरोग निवारण कार्यक्रमाअंतर्गत पालिकेनं घरोघरी भेट देऊन कृष्ठरुग्णांची शोध मोहीम २४ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या काळात मुंबई शहरात राबवली होती. यात ४७ लाख लोकसंख्येपैकी २८ लाख लोकांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. या प्रत्यक्ष तपासणीमध्ये १६ हजार संशयीत रुग्ण आढळले असून त्यातील ४१ रुग्णांना कृष्ठरोगाची लागण झाली आहे.

मुंबई शहरातील तब्बल ९१ टक्के कुटुंबांचं सर्वेक्षण

दरवर्षी राज्यातून जवळपास ४ हजार रुग्ण आढळतात. पण, यावर्षी ४ वेळा घेतलेल्या मोहिमेत एकूण ७ हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबई शहरातील तब्बल ९१ टक्के कुटुंबांचं सर्वेक्षण केलं गेल. त्यातून १६ हजार संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यातील ४१ जणांना कृष्ठरोगाची लागण झाली असून यात वाढ होण्याची शक्यता आहेत. दरम्यान मुंबईत एप्रिल ते सप्टेंबर २०१८ या काळात राबवलेल्या शोध मोहिमेत १९५ नवे रुग्ण आढळले आहेत.

वांद्रे भागात सर्वात जास्त रुग्ण

या मोहिमेत वांद्रे भागात सर्वाधिक १ हजार २२८ संशयित रुग्ण आढळले असून त्याखालोखाल १ हजार ३८६ रुग्ण चेंबूर परिसरात आढळले आहेत. परळमध्येही ७९७ रुग्ण आढळले आहेत. तपासणी केलेल्या संशयित ७ हजार ०९ रुग्ण तपासणीसाठी आरोग्य केंद्रावर दाखल झाले होते. त्यानंतर या लोकांची तपासणी केली गेली. त्यात ४१ नवे रुग्ण आढळले आहेत.

कुष्ठरुग्णांमध्ये त्वचेला त्रास होतो. पण, रुग्णांना कळत नाही कारण, त्या व्यक्तीच्या त्या भागाला खाज, खरुज अशा संवेदना होत नाहीत. त्यामुळे तिकडे दुर्लक्ष केलं जातं. आता, कुष्ठरुग्णांची संख्या कमी झाली आहे. हजारांमध्ये १ असे रुग्ण आता आढळतात. तसंच, जवळपास १० टक्के केसेस या १५ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये आढळत आहेत.
-डॉ. राजू जोटकर, सहाय्यक संचालक, कुष्ठरोग विभाग


हेही वाचा – चार दिवसाचा असतानाच आईने निवडणूक बैठकीला नेलं – शरद पवार

First Published on: October 25, 2018 7:00 AM
Exit mobile version