राज्यात ४,१५३ नवे रुग्ण, ३० जणांचा मृत्यू

राज्यात ४,१५३ नवे रुग्ण, ३० जणांचा मृत्यू

corona Update: राज्यात आज ७ हजार ८६३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याची चर्चा सुरू असली तरी महाराष्ट्रात अद्यापही रुग्णांची संख्या आटोक्यात असल्याचे दिसून येत आहे. मात्र मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ही चार हजारांमध्ये आहे. सोमवारी राज्यामध्ये ४,१५३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,८४,३६१ झाली आहे. राज्यात ८१,९०२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ४६,६५३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६१ टक्के एवढा आहे.

राज्यात ३० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १४, कल्याण डोबिवली मनपा १, नाशिक मनपा १, पुणे २, सातारा ३, लातूर ३, बीड ३ यांचा समावेश आहे. आज ३,७२९ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६,५४,७९३ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०२,८१,५४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,८४,३६१ (१७.३५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,१७,७११ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,५२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: November 23, 2020 8:38 PM
Exit mobile version