राज्यात ४,२५९ नवे रुग्ण, ८० जणांचा मृत्यू

राज्यात ४,२५९ नवे रुग्ण, ८० जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update : चिंताजनक! राज्यात 1,134 कोरोनाबाधितांची नोंद, ३ जणांचा मृत्यू

राज्यात ४,२५९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८,७६,६९९ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ७३,५४२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ८० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ४८,१३९ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ८० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १०, ठाणे ५, मीरा भाईंदर मनपा ४, नाशिक ५, पुणे ६, सातारा ४, नागपूर ७ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ८० मृत्यूंपैकी ५० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३ मृत्यू यवतमाळ ३, अमरावती २, नागपूर २, नंदूरबार २, बुलढाणा १, चंद्रपूर १, पुणे १ आणि ठाणे १ असे आहेत.

आज ३,९४९ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १७,५३,९२२ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४६ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१६,३८,३३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,७६,६९९ (१६.१३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,२५,६२३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,५०० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: December 12, 2020 8:47 PM
Exit mobile version