Maharashtra: केवळ दोनच दिवसांत वाईन शॉपमुळे करोडोंची कमाई

Maharashtra: केवळ दोनच दिवसांत वाईन शॉपमुळे करोडोंची कमाई

वाईन्स शॉप वर महिला-पुरूषांनी गर्दी केली होती.

महाराष्ट्र सरकारने ३ मे २०२० रोजी लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील ३३ जिल्ह्यात (३ कोरडे जिल्हे वगळता गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर ) काही जिल्हयांमध्ये सशर्त परवानगी दिली. तर काही जिल्हयांमध्ये मद्य विक्री बंद आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त परवानगी दिल्यानंतर आतापर्यंत अंदाजित १२.५० लाख लिटर दारु विक्री झाली आहे. याची किंमत ४३ कोटी ७५ लाख रुपये असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी दिली आहे.

किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु असलेल्या जिल्हयांची नावे

1. ठाणे, 2. पालघर, 3. रायगड, 4. पुणे, 5. सोलापूर 6. अहमदनगर, 7. कोल्हापुर, 8. सांगली, 9. सिंधुदुर्ग, 10. नाशिक, 11. धुळे, 12. नंदुरबार, 13. जळगाव, 14. भंडारा, 15. यवतमाळ, 16. अकोला, 17. वाशिम व 18. बुलढाणा.

किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु न केलेल्या जिल्हयांची नावे

1.सातारा, 2. औरंगाबाद, 3. जालना, 4. बीड, 5. नांदेड, 6. परभणी, 7. हिंगोली, 8. नागपुर, व 9. गोंदिया.

किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु झाल्या होत्या परंतू पुन्हा अनुज्ञप्तीबंद करण्यात आल्या

1. मुंबई शहर, 2. मुंबई उपनगर, 3. उस्मानाबाद, व 4. लातुर.

किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु होण्याची शक्यता असलेले जिल्हे

1. रत्नागिरी, 2. अमरावती

राज्यात 24 मार्च, 2020 पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.राज्यात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्वविभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहे. काल दि.05 मे, 2020 रोजी राज्यात 121 गुन्हे नोंदविण्यात आलेअसून 62 आरोपींना अटक करण्यात आली असून २९ लाख ८० हजार रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. 24 मार्च, 2020 पासुन दि. 05 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 4756 गुन्हेनोंदविण्यात आले असून 2061 आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर 430 वाहने जप्त करण्यात आली असून रु.12.53/- कोटी किंमतीचा एकूणमुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्या करिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24 X 7 सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.

टोल फ्री क्रमांक – १८००८३३३३३३

व्हाट्सअँप क्रमांक – ८४२२००११३३

ईमेल – commstateexcise@gmail.com

First Published on: May 6, 2020 10:39 PM
Exit mobile version