राज्यात करोनाचे ४४० नवे रुग्ण

राज्यात  करोनाचे ४४० नवे रुग्ण

राज्यात रविवारी ४४० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ८०६८ वर गेली आहे. तर ११२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत ११८८ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तसेच 19 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 342 वर पोचली आहे.

राज्यात १९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सर्वाधिक १२ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात ३, जळगाव 2, सोलापूर शहरात 1 तर लातूरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या १९ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७ रुग्ण आहेत तर १० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर २ रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. या १९ मृत्यूंपैकी ४ रुग्णांच्या इतर आजारांबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही. उर्वरित १५ रुग्णांपैकी ११ जणांमध्ये (७३ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,१६,३४५ नमुन्यांपैकी १,०७,५१९ जणांचे निगेटिव्ह आले आहेत तर ८०६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ६०४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ८६०३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ३३.७२ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात १,३६,९२६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ९,१६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: April 27, 2020 6:50 AM
Exit mobile version